ठाकरे घराण्याला इतिहास रचण्यासाठी राज ठाकरेंची साथ?

राज ठाकरे यांनी 27 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, मात्र मनसेच्या या यादीत वरळीतून आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिलेला नाही.

ठाकरे घराण्याला इतिहास रचण्यासाठी राज ठाकरेंची साथ?
Raj Thackeray Aaditya Thackeray
Follow us
| Updated on: Oct 02, 2019 | 8:48 AM

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या रुपाने ठाकरे कुटुंबाचा पहिला सदस्य निवडणुकांच्या रिंगणात उतरत आहे. वरळीतून रिंगणात उतरत जनतेतून निवडून येणारा ‘पहिला ठाकरे’ होण्याचा मान पटकवण्याच्या तयारीत आदित्य ठाकरे आहेत. अशा वेळी आदित्य यांचे काका आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (No MNS Candidate in Worli) यांची अप्रत्यक्ष साथ त्यांना लाभणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं आहे. 27 उमेदवारांची पहिली यादी मनसेने जाहीर केली. मात्र पहिल्या यादीत वरळीत उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे आदित्य ठाकरेंविरोधात मनसेकडून उमेदवार दिला जाणार नसल्याची (No MNS Candidate in Worli) शक्यता वर्तवली जात आहे.

आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर पुरोगामी पक्षाच्या आघाडीच्या वतीने तगडा उमेदवार देण्याची तयारी केली आहे. आदित्य ठाकरेंविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे घटनातज्ञ अॅड. सुरेश माने हे उमेदवार असण्याची शक्यता आहे.

खरं तर, सुप्रिया सुळे पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी विरोधात उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला होता. याची जाण ठेवत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देण्यास शरद पवार सकारात्मक नव्हते. मात्र लोकसभा निवडणुकीत पार्थ पवार यांचा पराभव करणारा शिवसेनेचा उमेदवार असल्यामुळे अजित पवार हे काकांच्या निर्णयावर समाधानी नसल्याचं म्हटलं जात होतं.

आदित्य ठाकरेंनी मागील काही महिन्यांपासून महाराष्ट्र पिंजून काढला आहे. यातून त्यांनी विधानसभा निवडणुकीत शक्तीनिशी उडी घेतल्याचं बोललं जात आहे. आदित्य ठाकरे 3 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. भाजप-शिवसेना युतीच्या अधिकृत घोषणेनंतर आदित्य ठाकरेंची उमेदवारी जाहीर करण्यात आली.

राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदी असलेले सचिन अहिर शिवसेनेत सामील झाल्यामुळे वरळीतून लढताना आदित्य ठाकरेंच्या बाहूत अधिक बळ आलं आहे. मनसेनेही तलवार म्यान केल्यास मराठी मतं आदित्य ठाकरेंना मिळतील, यात शंका नाही. त्यातच गुजराती आणि दाक्षिणात्य भाषांमध्ये पोस्टरबाजी करत आदित्य ठाकरेंनी अमराठी भाषिकांनाही वळवण्याचा प्रयत्न केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करताना ठाकरे कुटुंबीयांसह शिवसेनेचे नेतेही उपस्थित होते. परंतु उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर बंडोबांना शांत करत असल्यामुळे लेकाच्या ऐतिहासिक घोषणेचे ते प्रत्यक्ष साक्षीदार होऊ शकले नाहीत.

दरम्यान, माहिम मतदारसंघातून नितीन सरदेसाई यांचा पत्ता कट झाला आहे. या ठिकाणी संदीप देशपांडे यांना संधी देण्यात आली आहे. तर शिवडीतून तीन वेळा आमदार राहिलेल्या बाळा नांदगावकर यांचंही यादीत नाव नाही. आपल्याबाबत राज ठाकरे निर्णय घेतील, असं नांदगावकर म्हणाले आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.