Maharashtra Political Crisis : दोस्त दोस्त ना रहा! शिवसेनेत बंडखोरी, ‘भाजप’कडून ऑफर? सत्तेचा फॉर्म्यूला बनला, राज्यपालांकडे जाणार कोण?

एकेकाळी युती सरकारमध्ये सोबत असेलेली आणि एनडीएचा भाग असलेल्या शिवसेनेला त्यांच्याच जुन्या मित्रपक्षाकडून अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्र सांगतात. भाजपच्या हलचाली वाढल्या असून काल झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर चर्चा झाल्याचं सूत्र सांगतात. इतकंच नव्हे तर हीच चर्चा आता सत्तास्थापनेच्या नव्या फॉर्म्यूल्यापर्यंत गेल्याचं कळतंय.

Maharashtra Political Crisis : दोस्त दोस्त ना रहा! शिवसेनेत बंडखोरी, 'भाजप'कडून ऑफर? सत्तेचा फॉर्म्यूला बनला, राज्यपालांकडे जाणार कोण?
राज्यात सत्तासंघर्षImage Credit source: social
Follow us
| Updated on: Jun 28, 2022 | 3:40 PM

मुंबई : महाराष्ट्रात चाललेला सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis), शिवसेनेत वाढलेली बंडखोरी आणि भाजपकडून (BJP) त्याच बंडखोरांना दिलेली सत्तेची ऑफर, यावरुन ‘दोस्त दोस्त ना रहा’, असं म्हणण्याची वेळ या राज्यकर्त्यांवर आल्याचं दिसतंय. एकेकाळी युती सरकारमध्ये सोबत असेलेली आणि एनडीएचा (NDA) भाग असलेल्या शिवसेनेला त्यांच्याच जुन्या मित्रपक्षाकडून अडचणीत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सूत्र सांगतात. एकनाथ शिंदे गटानं शिवसेनेतून बंडखोरी करून वेगळी वाट पकडली आहे. तर याचा धक्का बसलेल्या महाविकास आघाडी सरकारला कधीही राज्यपाल बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देऊ शकतात, अशी परिस्थिती सध्या राज्यात निर्माण झालीय. दुसरीकडे सत्तासंघर्ष सुरू असताना भाजपच्या हलचाली वाढल्या असून काल झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर चर्चा झाल्याचं सूत्र सांगतात. इतकंच नव्हे तर हीच चर्चा आता सत्तास्थापनेच्या नव्या फॉर्म्यूल्यापर्यंत गेल्याचं कळतंय. शिवसेनेतील बंडखोरीपासून सत्तेच्या नव्या फॉर्म्यूल्यापर्यंतची प्रत्येक अपडेट आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत…

बंडखोर वाढताय! सरकार अल्पमतात?

शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गटात आमदार वाढत असून महाविकास आघाडी सरकार अल्पमतात येण्याची चिन्ह आहेत. दिवसागणिक शिवसेनेचे आमदार नॅटरिचेबल होत असून ते थेट गुवाहाटीमध्ये असल्याचं नंतर कळतंय. यामुळे सरकार वाचवण्याचं मोठं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर उभं राहिलंय. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचा बंडखोर आमदारांना दिलासा मिळाला असून तुर्तास त्यांच्या निलंबनावर स्थगिती आली आहे. त्यामुळे शिंदे गटाचा सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसंतय.

सत्तेचा नवा फॉर्म्यूला काय?

बंडखोर एकनाथ शिंदे गट आणि भाजप यांच्याकडून सरकार बनवण्याची तयारी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी सत्तेचा फॉर्म्यूला देखील बनला असल्याचं सूत्रांच्या माध्यमातून समोर आलंय. तो फॉर्म्यूला काय आहे. हे जाणून घ्या..

सत्तेच्या नव्या फॉर्म्यूल्यात शिंदे गटाला काय?

  1. शिंदे गटाला भाजपची ऑफर
  2. उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिदेंना
  3. आठ आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद
  4. पाच आमदारांना राज्य मंत्रीपद

सत्तेच्या नव्या फॉर्म्यूल्यात भाजपला काय?

  1. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद
  2. भाजपचे 29 आमदार मंत्री बनतील
  3. अपक्ष आमदारांनाही मंत्री पदे

राज्यपालांकडे जाणार कोण?

शिवसेनेतील बंडखोर एकनाथ शिंदे गटानं महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणलं असून सरकारवर आता कधीही बहुमत सिद्ध करण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे राज्यपाल कधीही बहुमत सिद्ध करा, असा आदेश महाविकास आघाडी सरकारला देऊ शकतात. मात्र, अविश्वासाचा प्रस्ताव कोण मांडणार, याविषयी अजूनही शक्यताच वर्तवता येतायत. दरम्यान, अविश्वासाचा प्रस्ताव आणि पुढचं गणित काय असू शकतं पाहुया…

राज्यपाल ते सत्तास्थापना, काय घडणार जाणून घ्या…

  1. शिंदे गट काय करणार? – शिंदे गटानं शिवसेनेचा आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा काढल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयात दिलीय. तर न्यायालयानं देखील बंडखोर आमदारांवर 11 जुलैपर्यंत कारवाई करू नये, असे आदेश दिले आहेत. त्यामुळे शिंदे गट कधीही राज्यपालांना महाविकास आघाडी सरकारचा पाठिंबा काढल्याचं पत्र देऊ शकतं
  2. अविश्वासाचा प्रस्ताव कोण ठेवणार? – भाजप अविश्वासाचा ठराव मांडणार नाही. कोणताही छोटा पक्ष अविश्वासाचा प्रस्ताव ठेऊ शकतो. यानंतर महाविकास आघाडीला बहुमत सिद्ध करावं लागले. नसता सरकार अल्पमतात येण्याची चिन्ह निर्माण होऊ शकतात. दरम्यान, अजून तरी कुणीही महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अविश्वासाचा प्रस्ताव ठेवलेला नाही.
  3.  बहुमत सिद्ध करण्याची परीक्षा- अविश्वासाचा प्रस्ताव ठेवल्यास महाविकास आघाडी सरकारसमोर बहुमत सिद्ध करम्याची मोठी परीक्षा असणार आहे. कारण, बंडखोर आमदार शिवसेनेतून गेल्यानं त्यांचा बहुमताचा आकडा कमी झालाय. त्यामुळे सरकार त्यावेळी बहुमत कसं सिद्ध करणार, ते पहाणं महत्वाचं ठरेल.

भाजपकडून सत्तास्थापनेची तायरी?

भाजपच्या गोटात जोरदार हालचाली सुरु झाल्या आहे. मुंबईत भाजपच्या कोअर टीमची बैठक पार पडली. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. तसेच एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव आला नाही. त्यामुळे सध्या तरी भाजपची वेट अँड वॉचची भूमिका असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केले.

आमदारांना हजर राहण्याचे आदेश

एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह भाजपसोबत जात सरकार स्थापन करणार असल्याचं बोललं जात आहे.आता राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आलाय. भाजपने आपल्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. तसंच अपक्षांनाही हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.