नगरच्या महापौर निवडणुकीपूर्वी पेच, ‘घोडेबाजार’ उफाळण्याची शक्यता
अहमदनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता अहमदनगरमध्ये महापौरपदाच्या निवडीसाठी मोठा पेच निर्माण झालाय. तर सर्वच पक्षांनी नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे गटनोंदनी केली आहे. त्यामुळे आता महापौर कोणत्या पक्षाचा होतो याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. वाचा – अहमदनगर आणि धुळे महापालिकेचा अंतिम निकाल महापालिका निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष हालचाली करत […]
अहमदनगर : महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आता अहमदनगरमध्ये महापौरपदाच्या निवडीसाठी मोठा पेच निर्माण झालाय. तर सर्वच पक्षांनी नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे गटनोंदनी केली आहे. त्यामुळे आता महापौर कोणत्या पक्षाचा होतो याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. वाचा – अहमदनगर आणि धुळे महापालिकेचा अंतिम निकाल
महापालिका निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष हालचाली करत आहेत. तसेच बहुमत सिद्ध करण्यासाठी 35 ची मॅजिक फिगर हवी आहे. मात्र कोणत्याच पक्षाला ही फिगर गाठता आली नाही. त्यामुळे महापौर निवडीसाठी घोडेबाजार होण्याची शक्यता आहे.
या निवडणुकीत शिवसेना 24 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर राष्ट्रवादीला 18 जागा मिळून दोन नंबरचा पक्ष ठरला आहे. विशेष म्हणजे भाजपने ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. मात्र 14 जागांवर भाजपला समाधान मानावं लागलं. त्याचबरोबर सर्वच पक्षांनी नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे गटनोंदनी केली. त्यामुळे आता महापौर कोणत्या पक्षाचा होतो याकडे लक्ष लागलंय.
शिवससेनेकडून रोहिणी शेंडगे, तर भाजपकडून मालन ढोणे, तसेच राष्ट्रवादीकडून संपद बारस्कार, तर काँग्रेसकडून सुप्रिया जाधव आणि बसपाकडून मुदस्सर शेख यांची निवड करण्यात आली आहे.