नागालँडमध्ये आज इतिहास घडणार? 60 वर्षांनंतर यंदा प्रथमच महिला….

North eastern Assembly Election : ईशान्य भारतातील तीन राज्यांच्या निवडणुकांचे निकाल काही तासात हाती येतील. नागालँड राज्य यंदा चर्चेत आहे. कारण इथे ६० वर्षानंतर पहिल्याच महिला आमदार निवडून येण्याची दाट शक्यता आहे.

नागालँडमध्ये आज इतिहास घडणार? 60 वर्षांनंतर यंदा प्रथमच महिला....
अटोइजू येथून उभ्या असलेल्या भाजपच्या काहुली सेमा डावीकडे. उजवीकडे महिला मतदार.Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Mar 02, 2023 | 10:47 AM

North eastern Assembly Election – त्रिपुरा, मेघालय आणि नागालँड राज्यातील विधानसभा मतमोजणी सुरु झाली आहे. अगदी काही वेळातच तिन्ही राज्यातील स्थिती स्पष्ट होईल. पण नागालँड राज्यातील चार उमेदवारांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय. कारण यंदा इथे 60 वर्षांपासूनचा इतिहास बदलण्याची दाट शक्यता आहे. नागालँडच्या इतिहासात आजपर्यंत कुणीही महिला आमदार बनलेली नाही. पण यंदा प्रथमच चार मतदारसंघांवर महिलांनी दावा ठोकलाय. पहिली महिला आमदार बनण्याचा मान कुणाला मिळणार, याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलंय.

महिला मतदार जास्त

नागालँडचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे महिला मतदारांची संख्या जास्त आहे. तरीही आमदार पदापर्यंत कुणीही महिला पोहोचलेली नाही. यावेळी इतिहास घडण्याची अपेक्षा आहे. चार महिला आमदार मोठ्या हिंमतीने या स्पर्धेत उतरल्या आहेत.

कोण आहेत चार उमेदवार?

नागालँडमधील 183 उमेदवारांपैकी चार महिला निवडणुकीच्या मैदानात आहेत. दिमापूर-तृतीय विधानसभा मतदार संघातून एनडीपीपी ने हेखनी जाखलू यांना तिकिट दिलंय. तेनिंग येथून काँग्रेसच्या रोजी थॉम्पसन उभ्या आहेत. पश्चिम अंगामी येथून एनडीपीपीच्या सलहौतुओनुओ आणि अटोइजू येथून भाजपच्या काहुली सेमा मैदानात आहेत.

२ महिला खासदार

नागालँडमध्ये आमदारकीपर्यंत महिला पोहोचू शकली नाही. मात्र आजवर इथे 2 महिला खासदार बनल्या आहेत. 1977 मध्ये रानो मेसे शाजिया यांनी यूनायडेट डेमोक्रेटिक पार्टीकडून लोकसभा जिंकली होती. नागालँडच्या त्या पहिल्या महिला खासदार होत्या. त्यांच्यानंतर मागील वर्षी भाजपने नागालँडमधून राज्यसभेवर एस फांगनोन कोन्याक यांना नियुक्ती दिली.

नागालँडमध्ये 60 विधानसभा मतदारसंघ आहेत. 27 फेब्रुवारी रोजी येथे मतदान झालं. आज येथील मतमोजणी सुरु आहे. एनडीपीपी आणि भाजप युती 38 जागांवर आघाडीवर आहे. तर एनपीएफ 4आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.

नागालँडमध्येही NDPP युतीचं सरकार येणार?

60 सदस्य संख्या असलेल्या नागालँड विधानसभा निवडणुकांचीही मतमोजणी सुरु झाली आहे. भाजप आणि NDPP युतीचं इथं सरकार आहे. यावेळी भाजपने 20 तर NDPP ने 40 जागांवर निवडणूक लढवली. एक्झिट पोल्सनुसार, येथे NDPP आणि भाजप युती सरकारच येईल. युताला नागा पिपल्स फ्रंट तसेच काँग्रेसच्या उमेदवारांचं आव्हान आहे.

त्रिपुरा-मेघालयात काय?

त्रिपुरात 60 विधानसभा जागांसाठी 16 फेब्रुवारी रोजी मतदान झालं. इथे  90 टक्के मतदान झालं. या राज्यात सत्ताधारी पक्ष भाजपाचं इंडिजेनस पिपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा (IPFT) सोबत युती आहे. युतीला डाव्या आणि काँग्रेसचं आव्हान आहे.  बहुतांश एक्झिट पोल्सनी भाजप युतीला बहुमत मिळेल, असा निष्कर्ष काढलाय.

तर मेघालय राज्यात 85.17 टक्के मतदान झाल्याची माहिती आयोगाने दिली आहे. इथली मतमोजणी सुरु आहे. इथेही 60 विधानसभा मतदारसंघ आहेत. यापूर्वी येथे भाजप आणि एनपीपीचं युती सरकार होतं. मात्र निवडणुकीपूर्वी नॅशनल पिपल्स पार्टीसोबतची युती तुटली. हाच पक्ष येथे मोठ्या संख्येने चमत्कार दाखवणार, अशी चिन्ह आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.