परमबीर सिंग यांनीच पत्र लिहिले असं नाही तर सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडूनही खळबळजनक अहवाल, शासनाने तो लपवला : फडणवीस

सुबोधकुमार जयस्वाल यांनी सरकारकडे अहवाल सादर केला होता. तपासानंतर पोलीस बदल्यांचे रॅकेट उघडकीस आले होते. मात्र तो अहवाल शासनाने लपविला, असा आरोप फडणवीस यांनी केला.

परमबीर सिंग यांनीच पत्र लिहिले असं नाही तर सुबोधकुमार जयस्वाल यांच्याकडूनही खळबळजनक अहवाल, शासनाने तो लपवला  : फडणवीस
Ddevendra Fadnavis
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 7:42 AM

मुंबई :  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनीच मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय असं नाहीय. तर तत्कालिन पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल (Subodh Kumar Jaiswal) यांनीही सरकारकडे खळबळजनक अहवाल सादर केला होता. सरकारने तो लपवला, असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांनी केला. (Not only Parambir Singh wrote the letter but also a Serious report from Subodh Kumar Jaiswal Says Devendra fadanvis)

स्फोटक अहवाल शासनाने हातोहात लपवला

सुबोधकुमार जयस्वाल यांनी सरकारकडे अहवाल सादर केला होता. तपासानंतर पोलीस बदल्यांचे रॅकेट उघडकीस आले होते. त्याचे पुरावे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आले होते. मात्र तो स्फोटक अहवाल शासनाने हातोहात लपवला, असा सनसनाटी आरोप फडणवीस यांनी केला. ते नागपुरात बोलत होते.

…उलट रश्मी शुक्लांवरच कारवाई करण्यात आली

तत्कालिन गुप्तवार्ता आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडून हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे गेला आणि त्यांच्याकडून तो गृहमंत्र्यांकडे गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या अधीन राहून काही फोन पोलिसांकडून सर्व्हेलन्सवर होते. त्यातून गंभीर प्रकार समोर आले होते. मात्र त्यावर काहीच पावले उचलण्यात आली नाही उलट रश्मी शुक्ला यांच्यावर कारवाई करण्यात आली.

दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावर या सर्व प्रकरणाचा ठपका ठेवण्यात आला होता त्यांचा तिथेच पदस्थापना देण्यात आली. त्यामुळे एक एक करत वरिष्ठ अधिकारी केंद्रात गेले, असं फडणवीस म्हणाले.

नियम माहिती नाहीत का?

परमबीर सिंगांच्या अध्यक्षतेखालील कमिटीने सचिन वाझेंना नोकरीत घेतले, असं पवार सांगत आहेत. मात्र मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या निर्देशानंतरच त्यांनी हे काम केलं हे सांगायला पवार विसरले. निलंबीत अधिकाऱ्याला पद देताना एक्झिक्युटिव्ह हे पद देता येत नाही, हे साधे नियम सरकारला माहिती नाहीत काय? असा सवालही फडणवीस यांनी केला.

वाझेंच्या गाड्या कुणी वापरल्या?

एपीआय सचिन वाझे यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. त्या गाड्या गेल्या अनेक महिन्यांपासून कोण वापरत आहे?, याची चौकशी केली जावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

(Not only Parambir Singh wrote the letter but also a Serious report from Subodh Kumar Jaiswal Says Devendra fadanvis)

हे ही वाचा :

परमबीर हे विरोधकांची ‘डार्लिंग’, बहुमतावर कुरघोडी कराल तर आग लागेल, हा इशारा नसून वस्तुस्थिती : शिवसेना

ठाकरे सरकार चोरांचे, खुन्यांचे, लगोलग बरखास्त करा, प्रकाश आंबेडकर घेणार राज्यपाल कोश्यारी यांची भेट

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.