Eknath Shinde : आता काँग्रेसचे माजी नगरसेवकही एकनाथ शिंदेंच्या भेटीला; भिवंडीतील नगरसेवकांनी घेतली भेट

भिवंडी (Bhiwandi) महापालिकेतील काँग्रेसच्या (Congress) 20 माजी नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर ही सदिच्छा भेट असल्याचा खुलासा माजी महापौर जावेद दळवी यांनी केला आहे.

Eknath Shinde : आता काँग्रेसचे माजी नगरसेवकही एकनाथ शिंदेंच्या भेटीला; भिवंडीतील नगरसेवकांनी घेतली भेट
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 7:44 AM

ठाणे : भिवंडी (Bhiwandi) महापालिकेतील काँग्रेसच्या (Congress) 20 माजी नगरसेवकांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर ही सदिच्छा भेट असल्याचा खुलासा माजी महापौर जावेद दळवी यांनी केला आहे. पक्षातील 20 नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. आम्ही शिंदे गटात प्रवेश केला नसून, आमच्या जिल्ह्याचे नेते म्हणून आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी  शहरातील प्रलंबित विकास कामांसाठी निधी व काँग्रेसच्या बंडखोर 18 नगरसेवकांवर कारवाईबाबत चर्चा झाल्याची माहिती माजी महापौर जावेद दळवी यांनी दिली आहे. या भेटीबाबत बोलताना नगरसेवक देवानंद थळे यांनी सांगितले की, भिवंडी शहराच्या विकासाकडे नेहमीच सर्वांनी दुर्लक्ष केले. मात्र आता एकनाथ शिंदे हे आमच्या जिल्ह्याचे नेते आहेत, ते मुख्यमंत्री झाल्यामुळे शहराचा विकास होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे, त्यामुळे आम्ही नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

शिंदे गटात इनकमिंग सुरूच

दरम्यान दुसरीकडे शिंदे गटात होणारे नगरसेवकांचे इनकमिंग सुरूच आहे. गुरुवारी सकाळी आदित्य ठाकरे यांचा भिवंडीत मेळावा पार पडला. त्यानंतर रात्रीच भिवंडीच्या शिवसेना नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. याबाबत एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे. ‘ठाणे जिल्ह्यातील भिवंडी महानगरपालिका तसेच ठाणे ग्रामीण विभागातील शिवसेना नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी नंदनवन या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन युती सरकारला जाहीर पाठींबा दर्शविला’. असं एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

ठाणे, नवी मुंबईतही शिवसेनेत फूट

दरम्यान काही दिवसांपूर्वीच ठाण्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. ठाणे महापालिकेच्या जवळपास सर्वच माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला. ठाण्यासोबतच नवी मुंबई आणि कोकणातील अनेक पदाधिकारी आणि नगरसेवक देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना शिवसेनेतील एका मोठ्या आमदारांच्या गटाने पाठिंबा दिला होता. मात्र आता ते मुख्यमंंत्री झाल्यानंतर आमदारांसोबतच खासदार आणि शिवसेनेचे पदाधिकारी देखील मोठ्या संख्येने शिंदे गटात सभागी होत असल्याचे चित्र आहे.

Non Stop LIVE Update
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.