आता भाजपला ताकद दाखवतो, उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी; एकनाथ खडसेंची गर्जना

आज जळगावात भाजपच्या 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. | Eknath Khadse

आता भाजपला ताकद दाखवतो, उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी; एकनाथ खडसेंची गर्जना
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 4:38 PM

जळगाव: आता मी भाजपला ताकद दाखवून देतो. उत्तर महाराष्ट्रात आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेसच असेल, अशी गर्जना एकनाथ खडसे यांनी केली. जळगावात भाजपचे अनेक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. हे कार्यकर्ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यताही एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविली. (Eknath Khadse slams BJP in Jalgaon)

आज जळगावात भाजपच्या 60 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी एकनाथ खडसे हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. रावेर तालुक्यातील 60 भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इनकमिंग सुरू झाल्याचे बोलले जात आहे.

हौशे-गवशेच पक्ष सोडून जातील; गिरीश महाजनांचा टोला एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानंतर कोणीही भाजप सोडून जाणार नाही. जे हौशे-गवशे असतील तर तेच जातील. कोणत्याही नगरसेवकाने, जिल्हा परिषद सदस्याने राजीनामा दिलेला नाही, असे भाजप आमदार गिरीश महाजन यांनी सांगितले.

गिरीश महाजन आणि खडसेंमध्ये शाब्दिक युद्ध फडणवीस सरकारच्या काळात गिरीश महाजन हे जळगाव जिल्ह्यातील एकनाथ खडसे यांचे प्रतिस्पर्धी म्हणून उदयाला आले. देवेंद्र फडणवीस यांनी नियोजनपूर्वक रसद पुरवून गिरीश महाजन यांना जिल्ह्यात मोठे गेले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन अशी दोन शक्तीकेंद्रे उभी झाली होती. आता एकनाथ खडसे भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाल्याने हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे.

यापूर्वी गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे गेल्याने भाजपला कोणताही फरक पडणार नाही, असे वक्तव्य केले होते. तेव्हा आगामी काळात कोणाच्या पाठी किती लोक उभे आहेत, हे दिसूनच येईल, असा पलटवार एकनाथ खडसे यांनी केली. यानंतर गिरीश महाजन यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला होता. भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले. त्यामुळे तुमच्या जाण्याने पक्षात अनागोंदी माजेल, असे समजू नका, असे महाजन यांनी खडसेंना सुनावले होते.

संबंधित बातम्या:

भाजपमध्ये अनेकजण आले आणि गेले, आपण पक्ष सोडल्याने अनागोंदी माजणार नाही; महाजनांचा खडसेंना टोला

ताकद दाखवण्यास सुरुवात, भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी

खडसेंच्या बालेकिल्ल्यातील भाजपच्या पक्षबांधणी बैठकीचा उडाला फज्जा; कार्यकर्त्यांनी फिरवली पाठ

(Eknath Khadse slams BJP in Jalgaon)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....