Eknath Shinde : आता 12 आमदारांच्या निवडीवरुन राजकारण तापणार, राज्यपाल कोश्यारी पुन्हा चर्चेत येणार, मुख्यमंत्र्यांच्या पत्रात दडलंय काय?

विधान परिषेदवर 12 आमदार हे राज्यपाल नियुक्त असतात. त्याअनुशंगाने राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच या तीन्ही पक्षांकडून 12 नावाची यादी ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या यादीनुसार आमदारांची नियुक्ती ही करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक मतभेदही झाले होते.

Eknath Shinde : आता 12 आमदारांच्या निवडीवरुन राजकारण तापणार, राज्यपाल कोश्यारी पुन्हा चर्चेत येणार, मुख्यमंत्र्यांच्या पत्रात दडलंय काय?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 4:40 PM

मुंबई :  (MVA) महाविकास आघाडी सरकारच्या काळापासून (Legislative Council MLA) विधानपरिषदेवरील 12 राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली लागला नाही. आता महाविकास आघाडी सरकारला पायउतार व्हावे लागले आहे, तर शिंदे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे पुन्हा या आमदारांच्या निवडीचा मुद्दा नव्याने चर्चेत येत आहे. आणि त्याला कारण ठरले आहेत ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ते पत्र. महाविकास आघाडी सरकारने राज्यपालांना दिलेली ती आमदारांची यादी रद्द करावी अशी मागणी पत्राद्वारे (CM Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे या नव्या प्रकरणावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा चर्चेत येणार असेच चित्र आहे. मात्र, भाजप अन् शिंदे गटाकडून राज्यपालांना पत्र म्हटल्यावर ते काय निर्णय घेणार हे देखील तेवढेच महत्वाचे आहे.

नेमका काय आहे मुद्दा..?

विधान परिषेदवर 12 आमदार हे राज्यपाल नियुक्त असतात. त्याअनुशंगाने राज्यात महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच या तीन्ही पक्षांकडून 12 नावाची यादी ही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत या यादीनुसार आमदारांची नियुक्ती ही करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक मतभेदही झाले होते. शिवाय राज्यपाल यांच्या कार्यशैलीवरही सवाल उपस्थित करण्यात आले होते. आता शिंदे सरकारची स्थापना होताच महाविकास आघाडी सरकारने दिलेली ती यादी रद्द करण्याची मागणी होत आहे.

शिंदे सरकारकडून नवीन यादी

घर बदलले की घराचे वासेही बदलतात, त्या उक्तीप्रमाणे आता बदल होत आहेत. राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी रद्द करुन आता शिंदे सरकारकडून देण्यात आलेल्या यादीवर विचार करावा असे पत्रच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारांमध्ये कोणाची वर्णी लागणार हे पहावे लागणार आहे.

विरोधकांचे काय आहे म्हणणे?

महाविकास आघाडीने दिलेली यादी जर राज्यपाल यांनी रद्द केली तर आपण कोर्टात जाणार असल्याचा इशारा विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. दीड वर्षापासून त्यांच्याकडे यादी असताना त्यावर निर्णयही झाला नाही आणि ती फेटाळण्यातही आली नाही. म्हणजेच ती यादी अजूनही राज्यपाल यांच्या विचारधीन आहे. असे असताना यादी अचानक रद्द झाली तर मात्र, न्यायालयीन लढा लढणार असे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.