Vedanta Project : आता स्वाक्षरी मोहीम, भविष्यात फक्त आदेशाची वाट पाहणार, युवा सेनेची पुढची भूमिका काय?
देशात लोकशाही आहे, याचा विसर भाजपाला पडला की काय..! गेल्या काही वर्षापासून या पक्षाच्या वर्तनाने सर्वसामान्य जनतेचा त्यांच्यावरील विश्वास कमी होत आहे. असे असताना देखील या पक्षाकडून जनतेला कायम ग्राह्य धरले जाते. कुणालाही ग्राह्य धरणे तसे धोकादायकच आहे.
परभणी : (Vedanta Project) वेदांता प्रकल्पाचा मुद्दा आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केल्यानंतर विरोधकांकडून (State Government) राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक ठिकाणी तर आंदोलनाही सुरवात झाली आहे. युवा सेनेच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहिम राबवली जात आहे. एवढे सर्व होऊनही याबाबत राज्य सरकारने ठोस भूमिका घेतली नाहीतर मात्र, (Aaditya Thackeray) आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार रणनीती ठरवली जाणार असल्याचे युवासेनेच वरुण सरदेसाई यांनी स्पष्ट केले आहे. तर विरोधकांनी आरोप करण्यापेक्षा हा प्रकल्प गुजरातला गेलाच कसा याचे उत्तर जनतेला देण्याचे आवाहन सरदेसाई यांनी केले आहे.
युवासेनेची स्वाक्षरी मोहिम
राज्य सरकारच्या धोरणामुळेच वेदांता सारखा मोठा प्रकल्प हा गुजरातमध्ये गेला आहे. राज्य सरकारची भूमिका ही संशयास्पद असून गुजरातच्या हितासाठीच राज्य सरकारने असा निर्णय घेतला का असा, सवालही उपस्थित करण्यात आला आहे. त्यामुळे याबाबत जनतेच्या मनात काय आहे? हे जाणून घेण्यासाठी युवासेनेच्या वतीने राज्यभर स्वाक्षरी मोहिम राबवली जात आहे.
जनतेला गृहीत धरण्याचा डाव
देशात लोकशाही आहे, याचा विसर भाजपाला पडला की काय..! गेल्या काही वर्षापासून या पक्षाच्या वर्तनाने सर्वसामान्य जनतेचा त्यांच्यावरील विश्वास कमी होत आहे. असे असताना देखील या पक्षाकडून जनतेला कायम ग्राह्य धरले जाते. कुणालाही ग्राह्य धरणे तसे धोकादायकच आहे. मात्र, कोणत्याही मार्गाने सत्ता मिळवायची आणि जनतेवर ती लादायची ही भाजपाची परंपरा असल्याचा आरोप युवा सेनेचे वरुण सरदेसाई यांनी केला आहे.
प्रश्नांबाबत उदासिनता, पक्ष वाढवण्यातच रस
राज्यातील जनतेच्या प्रश्नांशी या सरकारला काही देणे-घेणे राहिलेले नाही. केवळ पक्ष संघटन आणि राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजकारण तर सोडाच पण विकास कामामध्ये अडथळी निर्माण करुन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सरदेसाई यांनी केला आहे. त्यामुळे वेदांता प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लागला नाही किंवा याबाबत स्पष्टीकरण जर दिले नाही तर मात्र, आदित्य ठाकरे यांच्या आदेशावरुन आंदोलन छेडले जाणार असल्याचेही ते म्हणाले.