मतदार यादीत नाव नाही? घर बसल्या अर्ज करा
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करायचे असेल, तर घरबसल्या तुम्ही वोटिंग कार्ड काढू शकता. 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यातले मतदान 19 मे ला होणार आहे. तर निकाल 23 मे ला जाहीर केला जाणार आहे. भारताचे नागरिक म्हणून मतदान करणे हा आपला अधिकार आहे. जर तुमचे नाव मतदान यादीत नसेल, तर […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान करायचे असेल, तर घरबसल्या तुम्ही वोटिंग कार्ड काढू शकता. 11 एप्रिलला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यातले मतदान 19 मे ला होणार आहे. तर निकाल 23 मे ला जाहीर केला जाणार आहे. भारताचे नागरिक म्हणून मतदान करणे हा आपला अधिकार आहे. जर तुमचे नाव मतदान यादीत नसेल, तर घरीबसूनही तुम्ही मोबाईलवर मतदान कार्डसाठी अर्ज करु शकता.
कोण करु शकतं मतदान?
भारत निर्वाचन आयोगानुसार 18 वर्षापेक्षा अधिक वय असलेला भारतीय नागरिक मतदान करु शकतो.ज्यांचे वय 1 जानेवारी 2019 पर्यंत 18 वर्ष पूर्ण झाले आहेत ते मतदान करु शकतात.
अशा प्रकारे मतदान यादीत आपल्या नावाचा समावेश करा
जर तुम्ही नवी मतदान कार्ड बनवत असाल, तर तुमच्याकडे स्वत:चा ईमेल आयडी आणि फोन नंबर असणे गरजेचे आहे. यानंतर तुम्हाला राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर www.nvsp.in वर जावे लागेल.
वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला FORM 6 पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म तुम्हाला लक्षपूर्वक भरावा लागेल. या फॉर्ममध्ये तुम्ही जी काही माहिती भरणार त्याच्या आधारावर तुमचे मतदान कार्ड बनणार. यामध्ये तुमचा फोटो, वय, EPIC नंबर, घरचा पत्ता, जन्म तारीख, वय, लिंगसह इतर माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे.
स्टेपनुसार फॉर्म कसा भरणार
- फॉर्म 6 ओपन झाल्यानंतर भाषा निवडा.
- जर तुम्ही मराठी भाषा निवडली तर तुमच्या राज्याचे नाव निवडा.
- विधासभा आणि लोकसभा क्षेत्राचे नाव निवडा, यासोबत तुमचा जिल्हा निवडा.
- यानंतर महत्त्वाची माहिती नाव, वय आणि पत्ता भरा.
- फोन नंबर आणि कुटुंबातल्या सदस्यांची माहिती भरा. ज्यांच्याकडे पहिल्यापासून मतदान कार्ड असेल.
- जर तुम्ही एका जागेवरुन दुसऱ्या जागेवर आहात आणि तुमच्या घराचा पत्ता बदलला आहे. तर तुम्हाला फॉर्म 8 भरावा लागणार आहे.
- तुम्हाला फॉर्ममध्ये एक स्टार असलेला कॉलम दिसेल, तो कॉलम भरणे अनिवार्य असेल
- यानंतर तुम्हाला मागितलेले डॉक्यूमेंट्स स्कॅन करुन अपलोड करावे लागतील. पत्त्याचा पुरावा , ओळख पत्रामध्ये वेगवेगळ्या कागदपत्रांची प्रत अपलोड करावी लागेल.
- आता तुमचा ईमेल आयडी आणि फॉर्म भरण्याची तारीख टाका.
- एकदा भरलेला फॉर्म पुन्हा तपासून पाहून सबमिट करा.
जर फॉर्म भरताना तुमच्याकडून काही चूक झाली, तर अर्ज केल्यानंतर 15 दिवसानंतरही तुम्ही सबमिट केलेल्या फॉर्ममध्ये बदल करु शकता.
संबधित बातम्या : तुमचं नाव मतदार यादीत आहे की नाही? इथे चेक करा