Raj Thackeray : नुपूर शर्माला माफी मागायला लावली, ओवैसी आमच्या देवतांना मनहूस म्हणतात त्यांना का माफी मागायला लावत नाही?; राज ठाकरेंचा सवाल
मनसे केवळ आंदोलनापुरता राहिलेला पक्ष आहे. आंदोलनाच्या नावाखाली स्टंटबाजी केली जाते असा आरोप विरोधकांकडून कायम केला जातो. पण राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केलेली आंदोलने आणि त्याचे फलीत उपस्थितांसमोर मांडले. ते म्हणाले की, मोबाईलवर हिंदी आणि इंग्रजी ऐकू येत होतं. आता मराठी ऐकू येतं. ते केवळ मनसेमुळे.
मुंबई : (Nupur Sharma) नुपूर शर्मा यांनी केलेल्या विधानावरुन त्यांना सबंध जगभरातील मुस्लिम बांधवांची माफी मागावी लागली होती. एवढेच नाही तर त्यांच्या विरोधात एक आंदोलनच पेटले होते. त्यामुळे भाजपच्या प्रवक्ते पदावरुनही त्यांना पायउतार व्हावे लागले होते. असे असताना केवळ (MNS Party) मनसेने त्यांची घेतली होती. त्या जे काही बोलल्या होत्या त्या झाकीर नाईकच्या मुलाखतीमधलेच होते. त्यांनी बोललेले एवढे लागले मग ओवैसी आमच्या देवतांना मनहूस म्हणतात त्यांच्यावर का कारवाई किंवा माफी मागण्याची वेळ येत नाही असा सवाल (Raj Thackeray) मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरे आगामी निवडणुकांच्या अनुशंगाने मनसे पदाधिकाऱ्यांना आयोजित कार्यक्रमात बोलत होते. शिवाय आतापर्यंतची आंदोलने यशस्वी करुन दाखवल्याचे दाखलेही त्यांनी यावेळी दिले. देशात चांगले मुस्लिम आहेत पण ओवेसी सारख्यांमुळे वातावरण गढूळ होते असाही टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.
मनसे आंदोलनामुळे मराठी माणसाला न्याय
मनसे केवळ आंदोलनापुरता राहिलेला पक्ष आहे. आंदोलनाच्या नावाखाली स्टंटबाजी केली जाते असा आरोप विरोधकांकडून कायम केला जातो. पण राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केलेली आंदोलने आणि त्याचे फलीत उपस्थितांसमोर मांडले. ते म्हणाले की, मोबाईलवर हिंदी आणि इंग्रजी ऐकू येत होतं. आता मराठी ऐकू येतं. ते केवळ मनसेमुळे. माझं भाषण सुरू असताना ठाण्यात ठळ्ळ असा आवाज आला. दुसऱ्या दिवशी मोबाईल कंपन्यांचं पत्रं आलं. लवकरात लवकर करतो. आम्ही म्हटलं लवकरात लवकर नाही. एक आठवडा देतो. एक आठवड्यात झालं. का नाही इतरांनी केलं.. हे भोंग्याचं आंदोलन केलं. किती वर्ष सुरू होतं. आम्ही भोंग्यांना पर्याय दिला. भोंगे काढा नाही तर हनुमान चालिसा सुरु करू. मुस्लिम लोकही म्हणतात बरं वाटतं कानाला असेही ते म्हणाले.
त्या दोघांमुळे जातीय मतभेद
नुपूर शर्मा ह्या त्यांच्या मनाचे काही बोलल्याच नव्हत्या तर झाकीर नाईकची मुलाखतीत जे बोलले तेच त्यांनी स्पष्ट सांगितले. त्यामुळे त्यांनी माफी मागावी आणि त्यांच्यावर पक्षाने कारवाई करावी असे काहीच घडले नव्हते. खऱ्या अर्थाने जातीय तेढ निर्माण करणारा ओविसी आणि त्याचा भाऊ असल्याचेही राज ठाकरे यांनी सांगितले. त्यातील एक जण आमच्या देवीदेवतांवर बोलतो. तो आमच्या देवी देवतांचे नावे मनहूस म्हणतो. त्याला कुणी या देशाते माफी मागायला सांगितलं नाही. या देशात अनेक चांगले मुसलमान आहे. पण यांच्यासारख्यांमुळे जातीय मतभेद निर्माण होतात असा आरोपही त्यांनी केला.
केलेली कामे जनतेसमोर मांडा
केवळ राजकारण करुन कामे केल्याचा अविर्भाव काही पक्षांकडून होत आहे. मनसेचे काम बोलते. आतापर्यंत अनेक आंदोलने केली आणि ते यशस्वीही करुन दाखवली. यामध्ये मराठी पाट्या, मोबाईलमध्ये मराठी भाषेचा समावेश,टोल बंद आणि आता भोंगे बंद होण्यामागे केवळ मनसेची भूमिका जबाबदार ठरलेली आहे. त्यामुळे केलेले काम सर्वसामान्यांपर्यत जाऊ द्या, असंख्य आंदोलनावर तुम्ही बोललं पाहिजे. तुम्ही का लपून राहताय. छाती ठोकपणे सांगा, सत्तेचा बाजार करायचा आणि महाराष्ट्रासाठी काय करायचं नाही असा सल्लाही पदाधिकाऱ्यांना त्यांनी दिला आहे.