धनगर आरक्षण अध्यादेशाचा निर्णय घ्या, अन्यथा जनआंदोलन उभारु, प्रकाश शेंडगेंचा इशारा
धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पुढील वाटचाल ठरवू, असेही प्रकाश शेंडगे यांनी सांगितले. (OBC Leader Prakash Shendge Demand Dhangar Reservation)
मुंबई : “धनगर समाजाचा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला नाही तर मोठं जन आंदोलन उभारु, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. याबाबत आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत निर्णय घेऊन येत्या दोन दिवस तारीख जाहीर करु,” अशी माहिती प्रकाश शेंडगे यांनी दिली. (OBC Leader Prakash Shendge Demand Dhangar Reservation)
याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अद्याप भेटायची वेळ दिलेली नाही. त्यांना भेटूनच धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पुढील वाटचाल ठरवू, असेही प्रकाश शेंडगे यांनी सांगितले.
“मराठा आरक्षण मागताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये ही आमची भूमिका आहे. यापूर्वीचा 58 मोर्च्यांमध्ये 40 टक्के जनता ही दलित बहुजन होती म्हणून पाठिंबा दिला होता. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. त्यावरचे आरक्षण त्यांनी घ्यावं. जर त्यांना मान्य असेल तर मग आम्ही खांद्याला खांदा देत त्यांच्या आंदोलनात सहभागी होऊ,” अशी भूमिका प्रकाश शेंडगे यांनी मांडली.
“भाजप खासदार उदयनराजे भोसले यांचे विधान योग्य आहे. या लोकशाहीत गोरगरिबांना न्याय मिळाला का असा प्रश्नही त्यांनी उपस्थितीत केला आहे. आजही गेरगरिबांची वाताहत होतं आहे. लोकशाहीचा काय उपयोग, राजेशाहीला आमचा पाठिंबा आहे. मुठभर लोकांनी गरिबांच्या डोक्यावरचं लोणी लोकशाहीत खाण्याचं पाप केलं आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आमचं म्हणणं ऐकावं, आम्हालाही सोबत घ्यावं, एवढंच आमचं सांगणं आहे,” असे प्रकाश शेंडगेंनी यावेळी सांगितले. (OBC Leader Prakash Shendge Demand Dhangar Reservation)
धनगर आरक्षण न मिळाल्यास सरकारला सळो की पळो करु, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा https://t.co/ErDx6mV0WT #OBC #DhangarReservation @girishg26
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 15, 2020
संबंधित बातम्या :
धनगर आरक्षण न मिळाल्यास सरकारला सळो की पळो करु, ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंचा इशारा