OBC Morcha : ओबीसी मुख्यमंत्रीपदासाठी दिवसभर राजकीय कल्लोळ, भुजबळांना काय वाटतं?

ओबीसींच्या संरक्षणाची आम्ही सरकार म्हणून जबाबदारी घेतो. त्यांच्या हक्कांवर आम्ही जराही परिणाम होऊ देणार नाही,' असं आश्वासनच छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

OBC Morcha : ओबीसी मुख्यमंत्रीपदासाठी दिवसभर राजकीय कल्लोळ, भुजबळांना काय वाटतं?
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 8:25 PM

नाशिक : ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी या मागणीसाठी रविवारी जालन्यात महामोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा गाजला तो आंदोलकांनी हातात घेतलेल्या बॅनर्समुळे आणि घोषणाबाजीमुळे. ‘पुढील मुख्यमंत्री ओबीसी समाजाचाच’ असं या बॅनरवर लिहिण्यात आलं होतं. आंदोलकही तशा घोषणा देत होते. त्यावर आता अनेक राजकीय पुढाऱ्यांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री आणि ओबीसी समाजाचेच नेते छगन भुजबळ यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.(Chhagan Bhujbal’s reaction about the OBC community’s march in Jalna)

‘अन्य समाजाचे, पक्षाचे मोर्चे निघतात. तसेच ओबीसी समाजाचेही काही प्रश्न आहेत. आम्ही सुद्धा जागृत आहोत, हे सगळ्यांना कळावं यासाठी हे मोर्चे काढले जातात. ओबीसींच्या संरक्षणाची आम्ही सरकार म्हणून जबाबदारी घेतो. त्यांच्या हक्कांवर आम्ही जराही परिणाम होऊ देणार नाही,’ असं आश्वासनच छगन भुजबळ यांनी दिलं आहे.

विजय वडेट्टीवार काय म्हणाले?

“हा मोर्चा कुणाच्याही विरोधात नाही. हा फक्त आमच्या हक्कासाठी आहे. ओबीसी नेत्यांच्या स्वतंत्र जनगणना करावी,” अशी मागणी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली. “कुणाला काय द्यायचं ते द्या, पण आमच्या हक्काचं आम्ही सोडणार नाही,” असेही वडेट्टीवार यावेळी म्हणाले.

“तुम्ही निवेदन दिलं की मी ते प्रश्न सातत्याने मांडत आहे. मी पक्ष, धर्म, जातपात सोडून फक्त ओबीसी म्हणून लढत आहे. जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा. ही प्रेरणा भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडून मिळाली. ते आज हयात नाहीत. त्यांनी केलेल्या संघर्षाला सलाम केलं पाहिजे. मंत्री छगन भुजबळ यांनीही धुरा हाती घेतली ते ही लढत राहिले, हे ओबीसींच्या हक्कसाठी लढणारे नेते आहेत. भविष्यात कशाचीही पर्वा न करता संघर्ष करणार आहे,” असं वडेट्टीवार म्हणाले.

‘मुख्यमंत्रीपदाची मागणी ओबीसींची तशीच दलितांचीही’

ओबीसी समाजाची मुख्यमंत्री होण्याची मागणी आहे. तशीच मागणी दलित समाजाचीही आहे. पण मी काही मुख्यमंत्री होणार नाही. मला माहिती आहे की मी होऊ शकणार नाही. उद्धव ठाकरे असल्यामुळे ओबीसी समाजाचा मुख्यमंत्री होणार नाही. पण मराठा समाजापेक्षा ओबीसी समाज मोठा असल्याचं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. त्याचबरोबर जातीनिहाय जनगणना होणं गरजेचं आहे. आपण यापूर्वी लोकसभेत मत मांडलं आहे. जनगणनेमुळे जातीवाद होईल असं नाही. तर प्रत्येकाला आपल्या जातीची ताकद कळेल. त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही आठवले यांनी सांगितलं.

पंकजांकडून गोपीनाथ मुंडेंचा व्हिडीओ ट्वीट

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीही आज एक ट्विट करून आपल्याच सरकारला आपल्याच आश्वासनाची आठवण करून दिली आहे. 2021मध्ये जनगणना होणार असून त्यात ओबीसींची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्यांनी भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या लोकसभेतील भाषणाचा एक 18 मिनिटाचा व्हिडीओही अपलोड केला आहे. पंकजा यांच्या या राजकीय कृतीचे अनेक अर्थ लावले जात आहेत. या मागणीच्या माध्यमातून ओबीसीच्या नेत्या म्हणून त्यांना जम बसवायचा आहे. राष्ट्रीय पातळीवर ओबीसींच्या नेत्या म्हणून उभं राहण्यासाठी पंकजा यांनी मोर्चेबांधणी सुरू केल्याचं सांगितलं जातंय.

संबंधित बातम्या :

जो ओबीसी की बात करेगा वो ही देश पे राज करेगा : विजय वडेट्टीवार

पंकजा जेव्हा मोदी सरकारलाच ओबीसींना दिलेल्या ‘कुछ वादेंची’ आठवण करून देतात!

Chhagan Bhujbal’s reaction about the OBC community’s march in Jalna

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.