Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मार्ग निघत नाही तोपर्यंत निवडणूका नको, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट

राष्ट्रवादी काँग्रेसनंही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग निघत नाही तोवर कोणत्याही निवडणुका नको अशी भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्र्यांकडून त्यांच्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीबाबत आढावा घेण्यात आला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर मार्ग निघत नाही तोपर्यंत निवडणूका नको, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट
नवाब मलिक
Follow us
| Updated on: Aug 31, 2021 | 10:24 PM

नवी मुंबई : ओबीसींचा राजकीय आरक्षणाचा मुद्दा निकाली निघत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुका नको, अशी भूमिका विरोध पक्ष असलेल्या भाजपने लावून धरली आहे. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसनंही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग निघत नाही तोवर कोणत्याही निवडणुका नको अशी भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी याबाबत माहिती दिली आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्र्यांकडून त्यांच्या जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. आगामी निवडणुकांबाबत या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती नवाब मलिक यांनी यावेळी दिलीय. (No election until the issue of OBC reservation is resolved – Nawab Malik)

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत मंत्र्यांच्या विभागाचा आढावा घेण्यात आला. पक्ष संघटना मजबूत करण्याबाबत चर्चा झाली. ईडी कारवाईबाबतही या बैठकीत चर्चा करण्यात आली. ईडी कारवाई ही ठरवून होत आहे. भाजप कटकारस्थान करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या त्या जिल्ह्याची स्थिती पाहून कशा लढायच्या हे ठरवलं जाईल. लोकांना उत्तेजित करण्याची भूमिका घेणं योग्य नाही, असं नवाब मलिक यांनी म्हटलंय. ओबीसी आरक्षण दिल्याशिवाय कुठल्याही निवडणुका नको ही राष्ट्रवादी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचं मलिक यांनी सांगितलं. तसंच येत्या 15 दिवसांत महामंडळाच्या नियुक्तीबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहितीही त्यांनी दिलीय.

दहिहंडी उत्सवावरुन भाजप, मनसेला टोला

केंद्र सरकारनं नियम घालून दिले आहेत. मात्र, भाजप आंदोलन करुन दहीहंडी साजरी करत दुटप्पी भूमिका घेत आहे. सरकारनं सणांबाबत तयार केलेल्या नियमावलीचं जनतेनं स्वागत केलं आहे. मात्र, राजकीय नेते नियमांचं पालन करत नाहीत. नेत्यांनी राजकीय लाभ घेण्यासाठी लोकांच्या जीवाशी खेळू नये, असा टोलाही त्यांनी मनसे आणि भाजपला लगावलाय.

..तर ओबीसींची अपरिमित हानी होईल – फडणवीस

जोपर्यंत ओबीसींना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेऊ नयेत. नाही तर ओबीसींची अपरिमित हानी होईल, असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिला आहे. 27 ऑगस्ट रोजी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व पक्षीय बैठक झाली. याबैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला असता हा इशारा दिला.

ओबीसींच्या जनगणनेची आवश्यकता नाही हे मी आजच्या बैठकीत स्पष्ट केलं आहे. इम्पिरिकल डेटा म्हणजे काय हे सुद्धा मी सरकारला सांगितलं आहे. त्यानुसार सरकारने कार्यवाही केली तर ओबीसींचं आरक्षण आणू शकतो. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका घेऊ नका. नाही तर ओबीसींची अपरिमित हानी होईल. या संदर्भात पुढच्या शुक्रवारी अंतिम निर्णय घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. काही कायदेशीरबाबी तपासण्यात येणार आहेत. त्यासाठी शुक्रवारी पुन्हा बैठका होणार आहे. आम्ही बैठकांना तयार आहोत, असं फडणवीस यांनी त्यावेळी सांगितलं होतं.

इतर बातम्या :

श्रावण महिन्यासह पावसाळी आजारांमुळे फळांची मागणी वाढली; बाजारभाव मात्र आवाक्यात

पुण्यात विमान प्रवाशांसाठी लवकरच 5 लाख चौरस फुटांचं टर्मिनल, सोयीसुविधा कशा असणार?

No election until the issue of OBC reservation is resolved – Nawab Malik

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.