राधाकृष्ण विखेंचा उमेदवारी अर्ज धोक्यात?

भाजपचे (BJP) शिर्डी विधानसभा मतदारसंघातील (Shirdi Assembly Constituency) उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज धोक्यात येण्याची शक्यता आहे.

राधाकृष्ण विखेंचा उमेदवारी अर्ज धोक्यात?
Follow us
| Updated on: Oct 05, 2019 | 4:28 PM

अहमदनगर: भाजपचे शिर्डी विधानसभा मतदारसंघातील (Shirdi Assembly Constituency) उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil Nomination Form) यांचा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज धोक्यात येण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात (Congress Candidate Suresh Thorat) यांनी विखेंच्या अर्जावर आक्षेप घेतला आहे. राधाकृष्ण विखेंनी ज्या वकिलाकडून प्रतिज्ञापत्र तयार केले. त्या वकिलाला प्रतिज्ञापत्र करण्याचा अधिकारच नसल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

काँग्रेसचे उमेदवार सुरेश थोरात यांनी संबंधित प्रकाराबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीवर आज (5 ऑक्टोबर) दुपारी 3 वाजता सुनावणी होणार आहे. त्यात निवडणूक निर्णय अधिकारी काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (4 ऑक्टोबर) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यात त्यांनी स्वतःसह अन्य प्रतिनिधींचे 3 असे एकुण 4 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, हे अर्ज दाखल करताना नोटरी करून दिलेल्या प्रमाणपत्रावरच काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. ज्या वकिलांकडे हे प्रमाणपत्र बनवण्यात आलं, त्यांचा नोटरी करण्याचा परवाना 2016 मध्येच संपला असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. याबाबत शिर्डी विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारही दाखल झाली आहे.

शिर्डीतील विधानसभा मतदारसंघासाठी विखे हे सर्वात अधिक मोठे दावेदार आहेत. अशावेळी त्यांच्याच उमेदवारी अर्जावर गंडांतर आल्यामुळे विखे गटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता निवडणूक निर्णय अधिकारी या आक्षेपावर काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.