ऋतुजा लटके यांच्या अडचणी वाढणार?, निवडणूक आयोगाकडे तक्रार

| Updated on: Oct 28, 2022 | 2:06 PM

अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक या ना त्या कारणामुळे सतत चर्चेत राहिली आहे. आता ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेण्यात आल्यानं पुन्हा एकदा या निवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे.

ऋतुजा लटके यांच्या अडचणी वाढणार?, निवडणूक आयोगाकडे तक्रार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक गेले अनेक दिवस चर्चेत होती. अनेक घडामोडी घडल्या. भाजपकडून (BJP) मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून सुरुवातीला राजकारण चांगलचं तापलं. ऋतुजा लटके यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर भाजपाने आपले उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. मुरजी पटेल यांनी पोटनिवडणुकीतून माघार घेतल्यानं लटके यांचा विजय जवळपास निश्चित माणला जात आहे. मात्र आता ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीव आक्षेप घेण्यात आल्यानं त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

उमेदवारीवर कोणाचा आक्षेप?

ऋतुजा लटके यांच्या उमेदवारील अपक्ष उमेदवार मिलिंद कांबळे यांच्याकडून आक्षेप घेण्यात आला आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी निवडणुकीतून माघार घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप  मिलिंद कांबळे यांनी केला आहे. त्यांनी याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार देखील केली आहे, सात दिवसांच्या आत उत्तर न आल्यास आपण न्यायालयात जाणार आहोत असा इशाराही मिलिंद कांबळे यांनी दिला आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा  ऋतुजा लटके यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

भाजपाची माघार

अंधेरी पूर्वची विधानसभा पोटनिवडणूक अनेक कारणाने आतापर्यंत चर्चेत राहिली आहे. सुरुवातीला ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून राजकारण चांगलचं तापलं होतं. लटके यांचा राजीनामा महापालिकेने मंजूर केल्यानंतर भाजपाने या निवडणुकीतून माघार घेतली. भाजपकडून मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. मुरजी पटेल यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे लटके यांच्या विजयाचीच शक्यता अधिक आहे.