मोदींबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट महागात, थेट तुरुंगात

| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मधुराई (तामिळनाडू) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने एमडीएमके पक्षाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे. एमडीएमकेच्या कार्यकर्त्याच्या विरोधात भाजपने तक्रार केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. साथियाराज बलु असं अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे. तामिळनाडूच्या तिरुचिरापल्लीमध्ये द हिंदू मक्कल काची आणि भारतीय जनता पार्टीने तक्रार दाखल केली होती आणि […]

मोदींबद्दल आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट महागात, थेट तुरुंगात
Follow us on

मधुराई (तामिळनाडू) : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट लिहिल्याने एमडीएमके पक्षाच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी अटक केली आहे. एमडीएमकेच्या कार्यकर्त्याच्या विरोधात भाजपने तक्रार केल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. साथियाराज बलु असं अटक करण्यात आलेल्या कार्यकर्त्याचं नाव आहे.

तामिळनाडूच्या तिरुचिरापल्लीमध्ये द हिंदू मक्कल काची आणि भारतीय जनता पार्टीने तक्रार दाखल केली होती आणि या कार्यकर्त्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.

“साथियाराज याने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला आक्षेपार्हरित्य एडिट केले होते. त्या फोटोमध्ये मोदींना एका कटोऱ्यासोबत दाखवले आहे. जे आक्षेपार्ह होते”, असं स्थानिक पोलिसांनी सांगितले.

पंतप्रधानांच्या मधुराई दौऱ्याआधी ही पोस्ट साथियाराज याने फेसबुकवर पोस्ट केली होती. त्यामुळे तो फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.

एमडीएमकेचे प्रमुख वायको यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावेळी विरोधही केला होता. मोदींच्या तामिळनाडू दौऱ्या दरम्यान रविवारी सोशल मीडियावर ‘Go Back Modi, Modi Go Back’ चे हॅशटॅग ट्रेंड होते. यावेळी लोक पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याला विरोध करत होते. #GoBackModi वापरुन रविवारी तब्बल तीन लाख ट्वीट करण्यात आले होते.

“कावेरी, मेकाडतु, स्टरलाईट मुद्द्यांवर मोदींनी मौन बाळगले आहे आणि निवडणूक जवळ आल्यावर प्रत्येक राज्यात मतदान मागण्यासाठी फिरत आहेत”, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

याआधीही मध्य प्रदेशमध्ये एक सामाजिक कार्यकर्त्याला दिल्ली पोलिसांनी अटक केली होती. सामाजिक कार्यकर्त्याने सोशल मीडियावर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट लिहिली, असा आरोप पोलिसांनी त्याच्यावर केला होता. या मुद्द्यावर काँग्रेसने विरोध दर्शवला होता.