नवी दिल्ली – उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाचे (UP CM Office) अधिकृत ट्विटर हॅक (Twitter Hack) करण्यात आले होते. शनिवारी हा प्रकार उघडकीस आला होता.आतातर चक्क उत्तर प्रदेश सरकारचे (UP Government) अधिकृत ट्विटर हँडल हॅक करण्यात आले आहे. यूपी सरकार @UPGovt च्या अधिकृत ट्विटर हँडलवर विचित्र पोस्ट केल्या जात आहेत. एकापाठोपाठ एक ट्विट करून अनेकांना टॅग केले जात आहे. अद्याप हँडल परत मिळाले नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. ट्विटर अकाऊंट हॅक केल्याने युपीच्या राजकारणात खळबळ माजली आहे. त्या अकाऊंटवरून विचित्र पोस्ट केल्या जात आहेत. योगी सरकारने ट्विटर अकाऊंट हॅक केल्याची माहिती जाहीर केली आहे.
उत्तर प्रदेश सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलशिवाय, उत्तर प्रदेश माहिती विभागाचे फॅक्ट चेक इन्फो @InfoUPFactCheck ट्विटर हँडल देखील हॅक करण्यात आले आहे.त्यावर अनेक लोकांना @UPGovt सारखे टॅग आणि ट्विट केले जात आहे. हॅकरने अद्याप कोणताही संदेश पोस्ट केलेला नाही. हॅकरने अद्याप अनेक ट्विटर अकाऊंट हॅक केले आहेत. परंतु सरकारच्या ट्विटर अकाऊंटवरून फक्त पोस्ट केल्या आहेत. तर इतर अकाऊंटवरून अद्याप कोणतीही पोस्ट केलेली नाही.
हॅकरने मुख्यमंत्री कार्यालय, देशाचे हवामान विभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांचे ट्विटर हँडल हॅक केले होते. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर अकाउंट शनिवारी हॅक करण्यात आले. हॅकर्सनी यूपी सीएमओच्या अधिकृत हँडलवरून अनेक ट्विट केले होते. हॅकरने यूपी सीएम ऑफिसच्या ट्विटरचा प्रोफाईल फोटोत बदल करण्यात आला होता. हॅकर्सनी टाकलेला प्रोफाईल फोटो बोरड एप यॉट क्लब एनएफटीसारखा दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक झाल्यानंतर 30 मिनिटांनी ते परत मिळवण्यात आले.दोन दिवसापुर्वी हवामान खात्याचे ट्विटर खाते देखील हॅक करण्यात आले होते.