अध्यक्ष कुणीही झालं तरी साहेबांच्या जीवावर राष्ट्रवादी पक्ष चालणार – अजित पवार

| Updated on: May 02, 2023 | 2:49 PM

शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष तयार होणार आहे. आपण सगळे त्या अध्यक्षाला साथ देऊ, त्या अध्यक्षाच्या पाठीशी उभं राहू, अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नव्या गोष्टी शिकत जाईल. त्याचबरोबर वेगळ्या-वेगळ्या राज्यांमध्ये जाणं तिथं बैठका घेणं असं अजित पवार म्हणाले.

अध्यक्ष कुणीही झालं तरी साहेबांच्या जीवावर राष्ट्रवादी पक्ष चालणार - अजित पवार
SHARAD PAWAR
Image Credit source: tv9marathi
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षावरुन मी निवृत्त होत असल्याचं विधान शरद पवारांनी (SHARAD PAWAR) एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात केल्यानंतर उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. कार्यकर्त्यांनी शरद पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. परंतु पवारांनी मी फक्त पक्षाचं अध्यक्षपदं सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचं जाहीर केलं आहे. त्यावेळी तिथं उपस्थित असलेल्या जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्याचबरोबर प्रतिभाताई पवार (PRATIBHATAI PAWAR) या सुध्दा भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल, सुनिल तटकरे, फौजिया खान यांनी पवार साहेबांना पद न सोडण्याची विनंती केली. ‘तुम्ही एक गैरसमज करून घेत आहात, “पवार साहेब पक्षामध्ये नाही अशातला भागच येत नाही. पवार साहेबांच्या आत्ताच्या वयाचा विचार करता कशामुळेकशामुळे पवार साहेबांच्या आत्ताचा वयाचा विचार करता सगळ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ” असं विधान अजित पवारांनी (AJIT PAWAR) केलं आहे.

अजित पवारांनी कार्यकर्त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. सुरुवातीला अजित पवारांनी तिथं बोलण्यास नकार दिला. परंतु नंतर साहेबांनी कालच हा निर्णय जाहीर करण्याचं ठरवलं होतं. पण सभा असल्यामुळे हा निर्णय त्यांनी पुढे ढकलला असल्याचं कार्यकर्त्यांना सांगितलं. आता तुम्ही भावनिक होऊन आमच्याकडे पर्याय नाही असं म्हणू नका, साहेबांनी फक्त पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते पुर्वी सारखे सगळीकडे फिरताना दिसणार आहेत असं अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितलं.

शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष तयार होणार आहे. आपण सगळे त्या अध्यक्षाला साथ देऊ, त्या अध्यक्षाच्या पाठीशी उभं राहू, अध्यक्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नव्या गोष्टी शिकत जाईल. त्याचबरोबर वेगळ्या-वेगळ्या राज्यांमध्ये जाणं तिथं बैठका घेणं असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

एक वय झाल्यानंतर आपण आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीला नवीन काय तरी शिकवत असतो. तशाच पद्धतीने सगळ्या गोष्टी होतील. त्यामध्ये तुम्ही काळजी कशा करीता करीत आहेत. कुणी जरी अध्यक्ष झालं तरी साहेबांच्या जीवावर राष्ट्रवादी पक्ष चालणार आहे असंही अजित पवार म्हणाले. शरद पवार साहेब आपल्या परिवारासोबत राहणार आहेत. त्यामुळं तुमच्या मनात तीळमात्र शंका बाळगू नका.