गेल्या 56 वर्षात अनेक आघात झाले, त्यांना गाडून शिवसेना पुढे गेली; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला अप्रत्यक्ष टोला
उरणमधून मशाल घेऊन मातोश्रीवर दाखल झालेल्या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्ष टोला लगावला.
मुंबई : उरणमधून मशाल घेऊन मातोश्रीवर दाखल झालेल्या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटाला अप्रत्यक्ष टोला लगावला. मी शिवतीर्थावर जे बोललो तेच आज मी इथेही बोलत आहे. ही माझी भावना आहे. शिवसेना (Shiv Sena) 56 वर्षांची झाली आहे. या 56 वर्षांमध्ये शिवसेनेने असे 56 जण पाहिले. मात्र ज्यांनी ज्यांनी शिवसेनेवर आघात करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यामुळे शिवसेना संपली नाही तर त्यांना गाडून शिवसेना पुढे गेली आहे. शिवसेना अधिक जोमाने उभी राहिली आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला टोला
उरणमधून शिवसेनेचं नवं चिन्ह असलेली मशाल घेऊन शेकडो कार्यकर्ते आज मातोश्रीवर दाखल झाले. या कार्यकर्त्यांशी उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाचे नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. शिवसेना 56 वर्षांची झाली आहे. या काळात शिवसेनेने असे 56 जण पाहिले. ज्यांनी -ज्यांनी शिवसेनेवर आघात करण्याचा प्रयत्न केला, त्यांना गाडून शिवसेना पुढे गेली. शिवसेनेने अधिक जोमाने भरारी घेतली असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मशाल चिन्हावर समता पार्टीचा दावा
दरम्यान नवं चिन्ह मिळाल्यानंतर देखील ठाकरे गटाच्या अडचणी अद्यापही कमी झालेल्या नाहीत. ठाकरे गटाला मिळालेलं नवं चिन्ह मशालवर बिहारमधील समता पार्टीने अक्षेप घेतला आहे. हे चिन्ह आमचं असल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढचं नव्हे तर समता पार्टीचा कार्यकर्ता पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षाचे पत्र घेऊन निवडणूक आयोगाकडे पोहोचला देखील आहे. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.