Maharashtra assembly speaker election : झिरवळ यांच्या एका विधानाने महाविकास आघाडीमध्ये ‘हिरवळ’ निवडीच्या तोंडावर मोठे विधान
विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. असे असताना निर्माण झालेल्या परस्थितीमध्ये नेमके काय होणार हे पाहणे महत्वाचे आहे. मात्र, ज्या उमेदवाराकडे अधिकचे बहुमत त्याची वर्णी अध्यक्ष म्हणून होणार आहे.
मुंबई : बदलत्या राजकीय परस्थितीमुळे आता (Assembly Speaker) विधानसभा अध्यक्षांची निवड देखील प्रतिष्ठेची बनलेली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष पदाची निवड केली जात आहे. त्यानुसार (BJP) भाजप-शिंदे गटाकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार यावर (Narhari Zirwal) झिरवळ यांच्या एका विधानावरुन महाविकास आघाडीमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. दोन्ही बाजूंकडून अर्ज दाखल केले असले तरी शिवसेनेचे गटनेते सुनील प्रभू हेच कायद्याने योग्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे निवडीच्या काहीवेळ आगोदर झिरवळकर यांनी दिलेली प्रतिक्रिया ही महत्वाची आहे.
अशी असणार आहे निवड प्रक्रिया
विधानसभा अध्यक्ष पदासाठी भाजप-शिंदे गट आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. असे असताना निर्माण झालेल्या परस्थितीमध्ये नेमके काय होणार हे पाहणे महत्वाचे आहे. मात्र, ज्या उमेदवाराकडे अधिकचे बहुमत त्याची वर्णी अध्यक्ष म्हणून होणार आहे. पण दोन्ही गटनेत्यांकडून व्हीप जारी करण्यात आल्याने सभ्रम अवस्था निर्माण झाली आहे. यावर नरहरी झिरवळकर यांनी कायदेशीर बाब पुढे केली आहे. कायद्यानुसारच सर्वकाही होणार आहे. तर शिवसेनेचे गटनेते सुनील प्रभू हेच कायदेशीर गटनेते असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर दुसरीकडे व्हीपचा प्रश्नच नाही. केवळ बहुमतावर अध्यक्षपदाची निवड होत असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.
गटनेत्याच्या व्हीपलाच अर्थ
अध्यक्ष पदाच्या निवडीसाठी दोन व्हीप आणि दोन गटनेते अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे सभागृहात नेमका कुणाचा व्हीप ग्राह्य धरला जाणार हे पाहणे देखील तेवढेच महत्वाचे आहे. मात्र, शिवसेनेकडून सुनील प्रभू यांनी काढलेला व्हीपच कायद्याने टिकेल असे मत झिरवळकर यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे अध्यक्ष पदाच्या निवडीलाही अधिकचे महत्व प्राप्त झाले आहे. दोन्ही पक्षाकडून अध्यक्षपदासाठी दावा केला जात आहे. पण प्रत्यक्ष निवड प्रक्रिया आणि आमदारांचा कौल यावरच सर्वकाही ठरणार आहे.
राहुल नार्वेकर की राजन साळवी
भाजपाने अध्यक्षपदासाठी एक तरुण चेहऱ्याला संधी दिली आहे. राहुल नार्वेकर हे अध्यक्षपदासाठीचे उमेदवार आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून राजन साळवी हे नशीब आजमिवणार आहेत. आतापर्यंत अध्यक्ष पदाच्या निवडीचे चित्र हे स्पष्ट असत. पण दोन व्हीप, दोन गटनेते आणि दोन उमेदवार यामुळे उत्सुकता शिघेला पोहचली आहे. त्यामुळे कायदेशीर बाब, आमदारांची भूमिका यावर विधानसभेचे अध्यक्ष ठरणार आहे.