मोदींच्या दौऱ्यावरुन वाद, हेलिपॅडसाठी एक हजार झाडांवर कुऱ्हाड

भुवनेश्वर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ओदिशातील बलांगीर जिल्ह्याचा दौरा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या दौऱ्यावेळी बालंगीर परिसरात पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरसाठी तात्पुरता हेलिपॅड उभारला जाणार आहे. यासाठी वनविभागाची परवानगी न घेता जवळपास एक हजार झाडं तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बालंगीरच्या वन अधिकारी समीर सत्पथी यांनी दिलेल्या माहितीनुसार, परवानगी न घेता तात्पुरता हेलिपॅड तयार करण्यासाठी जिल्ह्यातील […]

मोदींच्या दौऱ्यावरुन वाद, हेलिपॅडसाठी एक हजार झाडांवर कुऱ्हाड
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

भुवनेश्वर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ओदिशातील बलांगीर जिल्ह्याचा दौरा सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या दौऱ्यावेळी बालंगीर परिसरात पंतप्रधानांच्या हेलिकॉप्टरसाठी तात्पुरता हेलिपॅड उभारला जाणार आहे. यासाठी वनविभागाची परवानगी न घेता जवळपास एक हजार झाडं तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. बालंगीरच्या वन अधिकारी समीर सत्पथी यांनी दिलेल्या माहितीनुसार, परवानगी न घेता तात्पुरता हेलिपॅड तयार करण्यासाठी जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनच्या हद्दीतील अनेक झाडं कापण्यात आली आहेत. आता यासंबंधी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

मात्र या प्रकरणानंतर पर्यावरणप्रेमींनी मोदींवर जोरदारी टीका केली आहे.

दुसरीकडे ‘जे या यात्रेला घाबरले आहेत, ते वन अधिकाऱ्यांचा गैरफायदा घेत चुकीची माहिती पसरवत आहेत’, असा दावा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान यांनी केला. धर्मेंद्र प्रधान हे ओडिशाचे आहेत, मात्र सध्या ते मध्यप्रदेशातून राज्यसभा खासदार आहेत.

बालंगीरच्या पच्छिम ओडिशा टाऊनमध्ये एक हजार झाडांवर कुऱ्हाड फिरवण्यात आली आहे. ही झाडं भारतीय रेल्वेने  अर्बन प्लँटेशन कार्यक्रमादरम्यान 2016 साली 2.25 हेक्टरच्या क्षेत्रात लावली होती. हेलिपॅड बनवण्यासाठी येथील 1.25 हेक्टरवरील झाडांना कापण्यात आलं आहे. नियमांनुसार या झाडांना कापण्याअगोदर वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र अशी कुठल्याही प्रकारची परवानगी न घेताच या झाडांना कापण्यात आल्याने हा वाद निर्माण झाला.

दरम्यान, पंतप्रधानांच्या सुरेक्षेच्या दृष्टीने झाडं कापणे गरजेचं असल्याचं,  रेल्वे विभागाने सांगितले.

15 जानेवारीला पंतप्रधान मोदी हे ओदिशाच्या दौऱ्यावर आहेत. आधी ते 16 जानेवारीला जाणार होते, मात्र आता ते 15 जानेवारीला जाणार आहेत. या दरम्यान ते ‘स्वाभिमान समावेश’ सभेला संबोधित करतील. तसेच ते खुर्द-बलांगीर रेल्वे लाईनला हिरवा झेंडा दाखवतील.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.