पवार कुटुंबातून फक्त मी निवडणूक लढवणार : शरद पवार

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील एंट्री निश्चित केली आहे. पवार कुटुंबातून फक्त मीच निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीयांपैकी फक्त मी निवडणूक लढवणार आहे. अजित पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार निवडणूक लढवणार नाहीत, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना […]

पवार कुटुंबातून फक्त मी निवडणूक लढवणार : शरद पवार
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:25 PM

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकीतील एंट्री निश्चित केली आहे. पवार कुटुंबातून फक्त मीच निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबीयांपैकी फक्त मी निवडणूक लढवणार आहे. अजित पवार, रोहित पवार आणि पार्थ पवार निवडणूक लढवणार नाहीत, असं शरद पवार म्हणाले. त्यामुळे पार्थ पवार मावळमधून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना आता पूर्ण विराम मिळणार आहे.

पुणे एमआयटी शिक्षण संस्थेच्या लोणी काळभोरच्या संकुलात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरुढ पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी शरद पवार बोलत होते. रोहित पवार आणि पार्थ पवार यांनाही यावर्षी लोकसभा निवडणुकीसाठी संधी दिली जाऊ शकते, असा अंदाज बांधला जात होता. त्यामुळे पवार कुटंबातून एकाच वेळी चार जण निवडणूक लढणार का, असंही बोललं जात होतं. पण पवार कुटुंबातून मीच निवडणूक लढवणार असल्याचं शरद पवार म्हणाले. शरद पवार हे माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत.

सध्या माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील प्रतिनिधीत्व करतात. मात्र स्वत: विजयसिंह मोहिते पाटील यांनीच शरद पवारांना माढ्यातून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत आग्रह धरला आहे. शरद पवार यांनीच काही दिवसांपूर्वी ही माहिती दिली होती. तेव्हापूसन शरद पवार हे लोकसभा निवडणूक 2019 लढवणार की नाही याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. स्वत: शरद पवार यांनी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं यापूर्वीच जाहीर केलं होतं. मात्र शरद पवार यांनी पुण्यात केलेलं वक्तव्य संभ्रमात टाकणारं होतं. पण ते आता पुन्हा निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्वतःच जाहीर केलंय.

माढा लोकसभा मतदारसंघ

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेनंतर झाली. तत्पूर्वी येथे पंढरपूर राखीव लोकसभा मतदारसंघ होता. या मतदारसंघातून पुनर्रचनेनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी निवडणूक लढवली आणि विजयी झाले होते. त्या निवडणुकीत पवार यांना 5 लाख 30 हजार 596 मते मिळाली होती, तर त्यांचे विरोधक भाजपाचे सुभाष देशमुख यांना 2 लाख 16 हजार 137 मते मिळाली होती.

2014 मध्ये माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली होती, तर भाजपाने ही जागा स्वाभिमानी पक्षाला सोडून येथे विद्यमान कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली होती. याच निवडणुकीत विजयसिंह मोहिते पाटील यांचे सख्खे बंधू स्व. प्रतापसिंह मोहित पाटील यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली व निवडणूक लढविली होती. 2014 ला देशात नरेंद्र मोदी यांची लाट असताना माढा मतदारसंघ राष्ट्रवादीने राखला होता. ही लढत खोत व मोहिते पाटील यांच्यात अत्यंत चुरशीने झाली. या लढतीत विजयसिंह मोहिते पाटील यांनी बाजी मारली होती.

संबंधित बातम्या :

मावळ लोकसभा : पार्थ पवारांच्या नुसत्या नावाने भल्याभल्यांची सपशेल माघार

कोण पार्थ पवार? मी नाही ओळखत, पुढचा खासदार मीच : श्रीरंग बारणे

लोकसभेसाठी पार्थ पवारसह 21 जणांची यादी, राष्ट्रवादी म्हणते…

धनंजय मुंडे म्हणाले, उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही, आता पार्थ पवार म्हणतात……

पिंपरी-चिंचवड : धनंजय मुंडे म्हणाले, उठ पार्था तुझ्याशिवाय पर्याय नाही, आता पार्थ पवार म्हणतात…

पार्थ पवार मावळच्या रणांगणात, पदाधिकाऱ्यांच्या गुप्त भेटीगाठी सुरु

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.