हवा कुणाचीही येऊ द्या, बारामतीत हवा फक्त पवारांचीच : सुप्रिया सुळे
बारामती : आजपर्यंत हवा कोणाचीही आली तरी बारामतीत पवारांचीच हवा असते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. कोणाला बारामतीत झालेला विकास दिसत नसेल तर आपण त्यांच्या डोळ्यांवर मोफत उपचार करुन त्यांना विकास दाखवू, असंही त्या म्हणाल्या. गेल्या पाच वर्षात भाजपने जाहिरातींवर तब्बल 10 हजार 110 कोटी रुपये खर्च केले. हेच पैसे जनतेसाठी वापरले असते […]
बारामती : आजपर्यंत हवा कोणाचीही आली तरी बारामतीत पवारांचीच हवा असते, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावलाय. कोणाला बारामतीत झालेला विकास दिसत नसेल तर आपण त्यांच्या डोळ्यांवर मोफत उपचार करुन त्यांना विकास दाखवू, असंही त्या म्हणाल्या.
गेल्या पाच वर्षात भाजपने जाहिरातींवर तब्बल 10 हजार 110 कोटी रुपये खर्च केले. हेच पैसे जनतेसाठी वापरले असते तर त्यांचं भलं झालं असतं. मात्र स्वत:च्याच जाहिराती करण्यासाठी हे पैसे खर्च करण्यात आले. त्यामुळे आपण या निवडणुकीत कोणतंही सरकार आलं तरी संसदेत आवश्यकतेशिवाय इतर कामांसाठी जाहिरातीच करायच्या नाहीत याबद्दलचं विधेयक मांडणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.
बारामती तालुक्यातल्या वाणेवाडी, वडगाव निंबाळकर, माळेगाव आदी गावांमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाव भेट दौर्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारचा समाचार घेतला. देशात भाजप सरकार आल्यापासून जाहिरातींवर तब्बल 10 हजार कोटींचा खर्च करण्यात आलाय. हीच रक्कम जर जनतेच्या भल्यासाठी वापरली असती तर त्यांचा फायदा झाला असता.. त्यामुळं आता या निवडणुकीनंतर कोणतंही सरकार आलं तरी आपण सरकारनं आवश्यकतेशिवाय जाहिरातच करु नये याबाबत विधेयक मांडणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
बारामतीने 50 वर्षांपासून पवार कुटुंबीयांना साथ दिली. त्यामुळे देशात कोणतंही वारं आलं तरी बारामतीत हवा पवारांचीच असते. मात्र विरोधक म्हणतात बारामतीचा विकास झाला नाही. त्यांना बारामतीचा विकास दिसत नसेल तर बारामतीत होणार्या नेत्र तपासणी शिबिरात त्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करु, तरच त्यांना विकास दिसेल, असाही टोला त्यांनी लगावला.