शिवसेनेचा दसरा मेळावा तर नैसर्गिक; पण तुमच्या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी ‘हे’ करावेच लागेल; अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला

दसरा मेळाव्यावरून अंबादास दानवे यांनी  शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा हा नैसर्गिक असतो. मात्र तुम्हाला जर दसरा मेळाव्यासाठी गर्दी जमवायची असेल तर येणाऱ्या लोकांसाठी बसची व्यवस्था करावी लागेल असं दानवे यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा तर नैसर्गिक; पण तुमच्या मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी 'हे' करावेच लागेल; अंबादास दानवेंचा एकनाथ शिंदेंना सल्ला
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 3:02 PM

औरंगाबाद : सध्या दसरा मेळाव्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.  शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळावे या मागणीकरता उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाने शिवसेनेला दिलासा देत शिवाजी पार्कवर मेळावा घेण्याची परवानगी दिली आहे. मात्र दुसरीकडे उद्या शिंदे गट उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. यावरून आता विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाले दानवे?

दसरा मेळाव्यावरून अंबादास दानवे यांनी  शिंदे गटाला जोरदार टोला लगावला आहे. दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा हा नैसर्गिक असतो. हजारो लोक दसरा मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात. आम्हाला असे अनेक जण भेटतात जे दसरा मेळाव्यासाठी घरूनच भाकरी बांधून आणतात.

दुपारी जेवन करतात. रात्रीची भाकरी देखील त्यांनी सोबतच आणलेली असते. दुसऱ्या दिवशी ते कशाचीही अपेक्षा न करता आपल्या घरी जातात. हे तेच शिवसैनिक आहेत जे शिवसेना आणि शिवसेनाप्रमुखांच्या विचारावरील श्रद्धा व्यक्त करण्यासाठी दसरा मेळाव्याला आलेले असात. त्यांना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास आहे.

हे सुद्धा वाचा

मात्र दुसरं कोणी दसरा मेळावा घेण्याचा विचार केला तर त्यांना गर्दी जमवण्यासाठी बसची व्यवस्था करावी लागेल,  केवळ बसची व्यवस्था करूनच चालणार नाही तर दसरा मेळाव्याला आलेल्यांसाठी खाण्याची आणि पिण्याची पण व्यवस्था करावी लागेल. असा टोला अंबादास दानवे यांनी नाव न घेता शिंदे गटाला लगावला आहे.

पालकमंत्रीपदावरून निशाणा

दरम्यान यावेळी बोलताना दानवे यांनी पालकमंत्रीपदाच्या वाटपावरून देखील शिंदे, फडणवीस सरकारला टोला लगावला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात अनेक दिवस गेले. त्यानंतर पालकमंत्रीपदाचं वाटप करायला इतका वेळ लागला. सरकारमध्ये समन्वय असल्याचं दिसून येत नाही , असं त्यांनी म्हटलं आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.