मुंबई : विरोधीपक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांनी एक ट्विट केलं आहे. त्यामुळे त्या चर्चेत आल्या आहेत. त्यांनी BSNL ला पत्र लिहिलं आहे आणि आपली तक्रार बोलून दाखवली आहे.मी भाजपमधील काही मित्रांशी फोनवरून बोलल्यानंतर (BJP Leader Phone Call )माझ्या मोबाईलवरील सर्व कॉल्स डायव्हर्ट केले जात आहेत. मी कुणाला कॉल करू शकत नाही किंवा घेऊही शकत नाही”, अशी तक्रार करणारं ट्विट मार्गारेट अल्वा यांनी केलं आहे. शिवय त्यांनी एक वचनही दिलं आहे. “आपण माझा फोन पूर्ववत केलात तर मी भाजप, टीएमसी किंवा बीजेडीच्या कोणत्याही खासदाराशी फोनवर बोलणार नाही”, असा शब्द त्यांनी दिला आहे.
Dear BSNL/ MTNL,
हे सुद्धा वाचाAfter speaking to some friends in the BJP today, all calls to my mobile are being diverted & I’m unable to make or receive calls. If you restore the phone. I promise not to call any MP from the BJP, TMC or BJD tonight.
❤️
Margaret
Ps. You need my KYC now? pic.twitter.com/Ps9VxlGNnh
— Margaret Alva (@alva_margaret) July 25, 2022
आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणूक होऊ घातली आहे. अश्यात सत्ताधारी आणि विरोधक आपला उमेदवार निवडूण आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यादेखील अधिकाधिक खासदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. त्यासाठी त्यांनी नुकतंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांना आपल्याला पाठिंबा देण्याबाबत सांगितलं. हे दोनही नेते भाजपचे आहेत. शिवाय त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेत आपल्याला पाठिंबा देण्याबाबत विनंती केली. पण त्यांनी भाजपच्या काही नेत्यांना फोन केल्यानंतर त्यांच्या फोनवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या फोनला फॉरवर्ड केलं जात आहे, अशी तक्रार केली आहे.
मार्गारेट अल्वा यांचा जन्म 14 एप्रिल 1942 रोजी कर्नाटकातील मंगलोर येथे झाला. त्यांनी कर्नाटकात आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर मार्गारेट अल्वा यांनी काँग्रेसमध् प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना राज्यसभा खासदार केलं. विविध मंत्रालयांच्या समित्यांमध्येही त्यांचा सहभाग राहिला. 1975 मध्ये त्या काँग्रेसच्या सरचिटणीस झाल्या. अल्वा या चार वेळा राज्यसभेच्या सदस्या राहिल्या आहेत. त्यानंतर 1999 मध्ये त्या लोकसभेत निवडून आल्या. मार्गारेट अल्वा या राजस्थान, गोवा, उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांच्या राज्यपाल राहिले आहेत. आता त्या विरोधी पक्षाच्या उपराष्ट्रपतीपदाच्या म्हणजेच राज्यसभा सभापतीपदाच्या उमेदवार आहेत.