निवडणुकीतून माघार घे… नाही तर तुझा खासदार ‘बाळ’ अन् जिल्हाधिकाऱ्यांनाही कायमचा संपवू…. अज्ञाताने घरावर चिटकवलं पत्र, उस्मानाबादेत काय घडतंय?

मसला खुर्द या गावात सरपंच पदाची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. गावात स्थानिक विकास आघाडीचा सरपंच असून यात सर्वपक्षीय मंडळी आहेत.

निवडणुकीतून माघार घे... नाही तर तुझा खासदार 'बाळ' अन् जिल्हाधिकाऱ्यांनाही कायमचा संपवू.... अज्ञाताने घरावर चिटकवलं पत्र, उस्मानाबादेत काय घडतंय?
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Dec 16, 2022 | 11:35 AM

उस्मानाबाद | ग्रामपंचायत निवडणुकांवरून (Gram Panchayat Election) उस्मानाबादेतलं वातावरण प्रचंड तापलंय. खासदार ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे (Sachin Ombase) तसेच एका गावातील ग्राम पंचायत निवडणुकीतील उमेदवार यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. तुळजापूर तालुक्यातील मसला खुर्द गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. सदर उमेदवाराच्या घरावर अज्ञात व्यक्तीनं हे धमकीचं पत्र चिटकवलं आहे.

पत्रातला मजकूर काय?

अज्ञाताने या पत्रात लिहिलंय– ज्ञानेश्वर साळवे मदत कर. मतदानातून माघारी घे. शेवट पाठिंबा दे. नाही तर गावात राहायचं अवघड होईल. तुझा शाजदार ओम बाळ तुझा कलेक्टर व तुला नाही तर बघून घेऊ. वेळी आली तर संपवून टाकू. हितून तुझ्या आईला मतदान कोण करतय ते आम्ही बघत आहोत. मतदान केंद्रात कोण जातय बघताव… वेळ आली तर तुला पण कायमचं संपवून टाकू, तुझा खासदार बाळ अन् कलेक्टरलापण परिणाम भोगावे लागतील. लय दलित समाजावर उड्या मारतोय काय…..

बाळ उल्लेखाचा संदर्भ काय?

काही दिवसांपूर्वी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार ओमराजे निंबाळकर आणि राणा रणजित सिंह पाटील यांच्यात शाब्दिक चकमक झाली होती. ओमराजे यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील  आरेतुरेची भाषा वापरली होती. त्यावेळी राणा जगजितसिंह पाटील यांनी ओमराजेंना बाळ… असे संबोधले होते. त्यानंतर आता या धमकीच्या पत्रातही ओमराजेंसाठी बाळ असा उल्लेख आलाय.

गावातलं राजकारण काय?

मसला खुर्द या गावात सरपंच पदाची निवडणूक ही बिनविरोध झाली आहे. गावात स्थानिक विकास आघाडीचा सरपंच असून यात सर्वपक्षीय मंडळी आहेत. मसला गावच्या ग्रामपंचायतसाठी 11 जागांपैकी 7 जागा या बिनविरोध निघाल्या असून 4 जागेसाठी 18 तारखेला मतदान होत आहे. 4 जागेसाठी 2 स्थानिक पॅनलमध्ये लढत होत आहे. 2800 मतदार आहेत. सरपंचपदी रामेश्वर वैद्य हे बिनविरोध निवडून आहेत.

राष्ट्रवादी किसान सेलचे प्रदेश सचिव ज्ञानेश्वर साळवे यांच्यासह त्यांची उमेदवार असलेली आई कांताबाई यांना ही धमकी आहे. अज्ञाताने लिहिलेल्या या पत्रामुळे गावात तसेच जिल्ह्यात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून त्वरीत कारवाई करावी, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा साळवे कुटुंबियांनी दिला आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.