केंद्रीय मंत्र्यानेच केलं स्टिंग ऑपरेशन, रुग्णालयात रांगेतच उभ्या, हातात औषधांची चिठ्ठी…. पाहा काय घडलं?

उस्मानाबाद हा आकांक्षित जिल्हा असून या जिल्ह्यात विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री पवार उस्मानाबाद येथे आल्या होत्या.

केंद्रीय मंत्र्यानेच केलं स्टिंग ऑपरेशन, रुग्णालयात रांगेतच उभ्या, हातात औषधांची चिठ्ठी.... पाहा काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 2:12 PM

उस्मानाबादः केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांनी उस्मानाबादेत आज धडक मोहीम राबवली. उस्मानाबाद (Osmanabad) शासकीय रुग्णालयास भेट देत पंचनामा केला.  गुरुवारी दुपारी भारती पवार शासकीय रुग्णालयात पोहोचल्या. औषधांची (Medicines) चिट्ठी हातात घेऊन रांगेत उभ्या राहिल्या. खिडकीजवळ गेल्यावर त्यांना धक्कादायक उत्तर ऐकायला मिळालं. ते ऐकून त्या कर्मचाऱ्यावर चांगल्याच भडकल्या.

सामान्य नागरिकांनी हे उत्तर अनेकदा ऐकलंय. त्याविरोधात तक्रारही केली होती. आता केंद्रीय मंत्र्याच्या धडक दौऱ्यातही हेच उत्तर ऐकायला मिळालं. काही औषधे उपलब्ध नसल्याने खासगी दुकानातून खरेदी करण्याचा सल्ला कर्मचारी रुग्णांना देत होते. त्यावर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री पवार यांनी त्यांना जाब विचारला.

Pawar

भारती यांनी स्वतः रुग्णाची चिट्ठी हातात घेऊन रांगेत औषधे घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात गेल्यावर हा प्रकार समोर आला. केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी रुग्णालय प्रशासन आणि कर्मचाऱ्यांना चांगलंच झापलं.अनेक औषधे उपलब्ध नसल्याच्या नागरिकांनी केंद्रीय आरोग्यमंत्री पवार यांच्याकडे तक्रारी केल्या.

Pawar

उस्मानाबाद हा आकांक्षित जिल्हा असून या जिल्ह्यात विविध कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्री पवार उस्मानाबाद येथे आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकांक्षित जिल्ह्याचा खास आढावा व लक्ष देण्याची जबाबदारी मंत्री पवार यांच्यावर दिली आहे. पवार यांनी जागतिक एड्स दिनानिमित्त रॅलीस हिरवा झेंडा दाखवला त्यानंतर मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलची पाहणी केली.

यावेळी पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजाभाऊ गलांडे, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्षा अर्चना राणाजगजीतसिंह पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे उपस्थित होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.