मुख्यमंत्र्यांसमोर शशिकांत शिंदे म्हणाले, आमची निष्ठा शरद पवारांवर, उद्धव ठाकरेंकडून शब्द, सूडाने वागणार नाही!

नवी मुंबईत अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त माथाडी कामगार मेळावा पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांसमोर शशिकांत शिंदे म्हणाले, आमची निष्ठा शरद पवारांवर, उद्धव ठाकरेंकडून शब्द, सूडाने वागणार नाही!
Follow us
| Updated on: Sep 25, 2019 | 2:24 PM

नवी मुंबई : नवी मुंबईत अण्णासाहेब पाटील जयंतीनिमित्त माथाडी कामगार मेळावा पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख महायुतीचे नेते आणि मार्गदर्शक उद्धव ठाकरे असा केला.  या कार्यक्रमाला महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, भाजप आमदार प्रशांत ठाकूर, राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde NCP) उपस्थित होते.

शशिकांत शिंदे काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे साताऱ्याचे आमदार शशिकांत शिंदे यांनीही या कार्याक्रमाला हजेरी लावली. माझी निष्ठा शरद पवारांवर आहे असं शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर सांगितलं.

युती दोघांची होऊ दे मात्र वंचित माथाडी कामगारांना न्याय द्या,  असं आवाहन शशिकांत शिंदे यांनी केलं. शरद पवारांना आम्ही मानतो. शरद पवारांनी काही चुकीचे केले नसेल तर कारवाई होऊ नये अशी मागणी करतो, असंही शशिकांत शिंदे म्हणाले. पवारांवर चुकीची कारवाई होऊ नये, अशी माथाडी कामगारांची इच्छा आहे, असं त्यांनी नमूद केलं.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील मुद्दे

  • नीती आयोगाने ठरवले आहे की माथाडी कामगार यांच्या मागे उभे राहणार.
  • उद्या शिवसेना भाजप सरकार येणार आहे माथाडींच्या मागे उभे राहणार आहे
  • आचारसंहिता लागू झाली आहे त्यामुळे मी काही नवीन घोषणा करणार नाही. पण पंतप्रधान आवास योजना घर आणि सबसिडी देणार.
  • शशिकांत शिंदे माथाडींचे व्यासपीठ सर्वपक्षीय असेल असा आमचा उद्देश आहे. आम्ही कामगारांसाठी काम करणारे आहोत, तुम्ही काळजी करू नका.
  • उदयनराजेनी सांगितलं मला नरेंद्र पाटील यांच्या  मिशीची भीती वाटते, त्यामुळे खुद्द राजेंनी पाटील यांना सांगितल्याने त्यांना कोणाला घाबरायची गरज नाही
  • अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणाचा आवाज उठवला होता. यामुळे सरकार मराठा समाजाच्या पूर्णपणे पाठीशी हे मी सांगू शकतो.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

  • राज्याचे मुख्यमंत्री लवकर आले आणि मला उशीर झाला त्याबद्दल मी माफी मागतो.
  • या कार्यक्रमात नरेंद्र आणि देवेंद्र यांच्या फोटोत मी आहे, त्यामुळे तुम्हाला समजलं असेल असा उपरोधिक टोलाही.
  • नेते बक्कळ होत आहे कामगारांशी प्रामाणिक राहणारे नेते सध्या नाहीत
  • बाळासाहेब आणि अण्णासाहेब  लवकर एकत्र आले असते तर माथाडी कामगारांचा  मुख्यमंत्री झाला असता.
  • माथाडी कामगारांचा खासदार हे स्वप्न मी सोडलेला नाही, अर्थ  लावू नका सातारच्या जागेवर उद्धव ठाकरेनी दावा केला.
  • शशिकांतजी आपले राजकीय मतभेद असतील पण सूडाने वागणारे आम्ही नाही आहोत, मी आणि मुख्यमंत्री तुम्हाला शब्द देतो
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.