पाऊस किती पडणार हे सांगण्याइतपत आपलं विज्ञान प्रगत नाही : मुख्यमंत्री

कोल्हापूर आणि सांगलीतील पावसामुळे गेल्या 100 वर्षातील पावसाचे सर्व रेकॉर्ड तुटले आहेत. त्यामुळे नेमका पाऊस किती पडणार हे सांगण्या इतपत आपलं विज्ञान प्रगत नाही असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले.

पाऊस किती पडणार हे सांगण्याइतपत आपलं विज्ञान प्रगत नाही : मुख्यमंत्री
Follow us
| Updated on: Aug 10, 2019 | 4:57 PM

सांगली : महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पुराने थैमान घातलं आहे. गेल्या आठवडाभरापासून सांगली कोल्हापुरात महापुराने (Sangli Flood) स्थानिक नागरिकांची अक्षरशः दाणादाण उडवली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगली भागात पाहणी केल्यानंतर पत्रकार परिषद घेत याबाबतचा संपूर्ण आढावा सांगितला. त्यावेळी मुख्यमंत्री म्हणाले “निर्सगाच्या पुढे कोणाचेही काहीही चालत नाही. आपल्याकडे पाऊस नेमका किती मिलीमीटर पडणार हे आपल्याला समजू शकत नाही, तांत्रिकदृष्ट्या पावसाचं प्रमाण सांगितलं जातं. कोल्हापूर आणि सांगलीतील पावसामुळे गेल्या 100 वर्षातील पावसाचे सर्व रेकॉर्ड तुटले आहेत. त्यामुळे नेमका पाऊस किती पडणार हे सांगण्या इतपत आपलं विज्ञान प्रगत नाही.” असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले.

गावांच्या पुनर्विकासाठी मदत करा

सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांना मदतीसाठी सध्या सरकारकडे गहू, तांदळाचा साठा मुबलक प्रमाणात आहे. पुराचा फटका बसलेल्या गावांच्या पुनर्विकासाठी सरकार मदत करणार आहे. मात्र सरकारला मदतीची आवश्यकता असल्याने जास्तीत जास्त लोकांनी सरकारला मदत करावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

त्याशिवाय सिद्धीविनायक, शिर्डी, पंढरपूर, अंबाबाई, आर्ट ऑफ लिव्हिंग यासारख्या अनेक देवस्थानांकडूनही पूरग्रस्तांना मदत होत आहे. त्याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्थाही मदतीसाठी पुढे सरसावल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

सेल्फीवरुन गिरीश महाजनांची पाठराखण

मुख्यमंत्र्यांना जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांच्या सेल्फी व्हिडीओबाबत विचारणा केली असता, त्यांनी गिरीश महाजनांनी सेल्फी काढला नाही, उलट ज्या ठिकाणी लोक पोहचू शकत नाहीत, तिथे गिरीश महाजन पोहोचले, त्यामुळे लोकांना दिलासा मिळाला असे सांगत मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजनांची पाठराखण केली.

2005 पेक्षा यंदा तिप्पट पाऊस

सांगलीत 2005 मधील महापुरात 31 दिवसात 217 टक्के पाऊस पडला होता, मात्र यंदा 2019 मध्ये 9 दिवसात 758 टक्के पाऊस झाला. या आकडेवारीची तुलना करता यंदा 2005 च्या तुलनेत तिप्पट पाऊस 9 दिवसात पडला आहे. त्याशिवाय कोल्हापूरातही 9 दिवसात 480 टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे सांगली आणि कोल्हापुरात यंदा तिप्पट पाऊस झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

“जेव्हा ही सर्व भीषण पूरपरिस्थिती निर्माण झाली. तेव्हा मी दोन्ही शहरांना भेट देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मी कोल्हापूरला हेलिकॉप्टरद्वारे येऊन गेलो. मात्र पूरपरिस्थिती भीषण असल्याने मला खाली उतरण्याची परवानगी मिळाली नाही.” असेही मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठकीत सांगितले.

तसेच पुरग्रस्तांनो पॅनिक होऊ नका, आता कोल्हापूर आणि सांगलीत धोक्याची स्थिती नाही. त्यामुळे सर्वांचे व्यवस्थित नियोजन करता येईल असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेदरम्यान केले.

पूरग्रस्तांच्या बचावासाठी विशेष बचावपथक कार्यरत

गेल्या आठवडाभरापासून सांगली आणि कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओरिसा, पंजाब, गुजरात, गोव्यातून बचावपथक बचावकार्यासाठी महाराष्ट्रात आली आहेत. तसेच गृहसचिवांना विशेष विनंती करुन अधिक कुमकही मागवण्यात येत आहे.

तसेच गेल्या काही दिवसात कोयना धरणात 9 दिवसात 50 टीएमसी पाणी भरेल इतका पाऊस झाला. कृष्णा, कोयना, पंचगंगा नद्यांमधून पाण्याचा मोठा विसर्ग झाल्याने अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच 484 किमीचे रस्ते खराब झाले आहेत. तसेच महावितरणचे 2615 रोहित्रांचं नुकसान झाले आहे. त्यामुळे ही सर्व परिस्थिती कमीत कमी वेळेत पूर्ववत करण्याचे आदेश दिले आहेत.

3 लाखापेक्षा अधिक लोकांना बाहेर काढण्यात यश

त्याशिवाय ब्रह्मनाळ या ठिकाणी बोट दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अद्याप 8 जण बेपत्ता असून 2 जण जखमी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

तसेच नजर अंदाजानुसार 27 हजार 467 हेक्टर जमिनीवरील पीकाचं नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. दरम्यान आतापर्यंत दोन्ही जिल्ह्यातील 3 लाख 78 हजार लोकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर जवळपास 306 छावण्यांमध्ये नागरिकांच्या राहण्याची सोय केली आहे.

दरम्यान पूरग्रस्तांना थेट रोकड स्वरुपात मदत देणं शक्य होणार नाही. काही लोकांना रोख रक्कम स्वरुपात देण्यात येणार आहे. तर उर्वरित रक्कम बँक खात्यात देण्यात येणार आहे. तसेच छावण्यातील लोकांना भत्ता देण्यात येईल. जे छावणीमध्ये नाहीत त्यांनाही देण्यात येईल. यापूर्वी पुरात वाहून गेेलेल्या लोकांना केवळ दीड लाख रुपयांची मदत देण्यात येत होती. मात्र आता या रकमेत वाढ करुन ती 5 लाख रुपये करण्यात आली आहे.

100 डॉक्टरांची पथक रवाना

कोल्हापूर- सांगलीतील पुराचे पाणी ओसरल्यानंतर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरण्याची भिती व्यक्त केली जात आहेत. त्या दृष्टीने दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी 100 डॉक्टरांची पथकं पाठवण्यात आली आहेत. तसेच कुठेही गोळ्यांची कमतरता भासणार नाही याचीही पूर्णपणे काळजी घेण्यात येणार आहेत. तसेच या दोन्ही जिल्ह्यातील छोट्यातील छोट्या गावात डॉक्टर असतील याचीही काळजी घेण्यात येणार आहे.

पूर ओसरल्यानंतर दोन्ही जिल्ह्यातील साफसफाईला प्राधान्य देण्यात येणार आहे. कोल्हापूर आणि सांगलीत दोन्ही ठिकाणी महापालिकेची माणसे आणि मशिनरी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे स्वच्छता करण्यात मदत होणार आहे.

निधीची कमतरता भासणार नाही

तसेच ज्या लोकांचे शेतीचं नुकसान झाले असेल किंवा जमीन खरडून गेली असेल तर 38 हजार प्रती हेक्टर मदत देण्यात येईल. तसेच मृत जनावरांची विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे. तसेच अकास्मात निधीतून निधी देत आहोत.  तसेच येत्या काळात ज्या काही निधी लागेल त्या निधीची कमतरता भासणार नाही. जो काही निधी लागेल तो राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात येईल. असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

तसेच कोल्हापुरातील आंबेवाडी- प्रयाग चिखलीतील गावकऱ्यांना दुसरीकडे घरं बांधण्यासाठी जागा दिली.  मात्र लोकांनी तिकडे घरं बांधली, पण सध्या त्याच ठिकाणी राहतात असेही त्यांनी यावेळी सांगितले.

LIVE : सांगलीतून पूरग्रस्त भागातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लाईव्ह https://t.co/jB0qpDDqxT

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.