भाजपातून लढा किंवा शिवसेनेतून, औसा मतदारसंघात उमेदवार अभिमन्यू पवारच
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar Ausa) यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी कधीच आशीर्वाद दिलाय. पण आता शिवसेनेकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची प्रतिक्षा आहे.
लातूर : शिवसेना-भाजप युतीमध्ये कळीचा मुद्दा असलेली एक जागा म्हणजे लातूर जिल्ह्यातील औसा (Abhimanyu Pawar Ausa) मतदारसंघ. हा शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे. पण भाजपने या जागेवर दावा केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार (Abhimanyu Pawar Ausa) यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि पंकजा मुंडे यांनी कधीच आशीर्वाद दिलाय. पण आता शिवसेनेकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची प्रतिक्षा आहे.
1999 आणि 2004 च्या निवडणुकीत औसा येथून शिवसेनेचे दिनकर माने आमदार होते. त्यानंतर मात्र 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत शिवसेना इथे पराभूत झाली. भाजपाने स्वतंत्र लढताना गेल्या वेळी इथे धोबीपछाड खाल्ली. पाशा पटेल इथे गेल्या वेळी इथे उमेदवार होते. पण काँग्रेसकडून त्यांचा पराभव झाला. आता भाजपा अभिमन्यू पवार यांना उमेदवारी देत जोरदार तयारी करत आहे.
शिवसेनेला मात्र औसा मतदारसंघ हा आपला परंपरागत मतदारसंघ वाटतो. त्यामुळेच इथे शिवसेना आपला दावा मजबूत करताना दिसत आहे. याच जागेवरून आता युतीचं घोडं अडल्याची माहिती आहे .
औसा मतदारसंघाच्या बदल्यात भाजप शिवसेनेला उस्मानाबादमध्ये जागा वाढवून द्यायला तयार असल्याचं बोललं जातंय. मात्र शिवसेनेचा औसा इथे दावा आहे. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीतून भाजपात आलेले राणा जगजीतसिंह पाटील यांना एक जागा भाजपासाठी सोडली तर सर्व जागा शिवसेनेला द्याव्यात हा पर्यायही युतीच्या चर्चेत आहे.
युतीची ही चर्चा फार ताणली गेली तर भाजपचे इच्छुक उमेदवार अभिमन्यू पवार हे शिवसेनेतून लढतील असाही पर्याय चर्चेला आहे. एकूणच शिवेसेना औसा सोडत नसल्याने स्वतः मुख्यत्र्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. औसा लढवायचाच या उद्देशाने मुख्यमंत्र्यांनी या मतदारसंघात कोट्यवधींच्या योजना दिल्या. त्यामुळे ही जागा युतीत शिवसेनेला सुटली काय किंवा भाजपाला सुटली काय, मात्र उमेदवार मुख्यमंत्र्यांचे खासगी स्वीय सहाय्य्क अभिमन्यू पवार हेच रहावेत यासाठी धडपड सुरु आहे.
VIDEO : युतीतले पाच अडथळे