पालघरमध्ये भाजपचा शिवसेनेसह शिंदे गटालाही धक्का! फडणवीसांच्या उपस्थितीत पालघरच्या ‘या’ 2 दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश

Palghar BJP Politics : शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे विलास तरे यांनी भाजपात प्रवेश केलाय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

पालघरमध्ये भाजपचा शिवसेनेसह शिंदे गटालाही धक्का! फडणवीसांच्या उपस्थितीत पालघरच्या 'या' 2 दिग्गज नेत्यांचा भाजपात प्रवेश
शिवसेनेला धक्का
Follow us
| Updated on: Sep 22, 2022 | 9:03 AM

मोहम्मद हुसेन खान, पालघर : पालघरमधून मोठी राजकीय घडामोड (Maharashtra Politics) समोर येते आहे. भाजपने (BJP) शिवसेनेसह शिंदे गटाला पालघरमध्ये जोरदार धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. पालघरमधील शिवसेनेच्या दोघा माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत सेनेच्या दोघा माजी आमदारांचा भाजपात प्रवेश पार पडला. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. पालघरमधील शिवसेनेचे अमित घोडा आणि विलास तरे (Amit Ghoda and Vilas Tare) अशी भाजपात प्रवेश करणाऱ्या दोन नेत्यांची नावं आहेत.

शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे विलास तरे यांनी भाजपात प्रवेश केलाय. या दोन्ही शिवसेनेच्या माजी आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी भाजपात जाहीर प्रवेश केला.

कोण आहेत विलास तरे?

माजी आमदार असलेल्या या दोघांनीही पालघर जिल्ह्यात विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यातील विलास तरे हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 2009 आणि 2014 साली विलास तरे हे बहुजन विकास आघाडीकडून बोईसर विधानसभेवर निवडून आले होते. दरम्यान, 2019मध्ये निवडणुकीआधी तरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेच्या पालघरमधील अंतर्गत वादामुळे तरे यांचा पराभव झाला, असं बोललं जातं. बोईसर विधानसभा मतदारसंघातून 2019 साली निवडणूक लढवताना विलास तरे यांना हार पत्करावी लागली. तेव्हापासून तरे अस्वस्थ होते आणि ते शिंदे गटात जातील, अशी चर्चा सुरु होती.

कोण आहेत अमित घोडा?

दुसरीकडे शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा हे दिवंगत आमदार कृष्णा घोडा यांचे सुपुत्र आहे. ते 2016 साली झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेनेकडून पालघर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. पण 2019 साली विधानसभा निवडणुकीसााठी त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली होती.

अमित घोडा आणि विलास तरे यांची भाजपात प्रवेश केल्यानं पालघरमध्ये भाजपचं बळ वाढलंय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितमध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. पालिका निवडणुकांच्या आधी घडलेला हा पक्षप्रवेश मोठी राजकाय घडामोड मानला जातोय. या पक्षप्रवेशाने शिवसेनेसोबत शिंदे गटालाही धक्का दिल्याचं जाणकारांचं म्हणणंय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.