भाजपाच्या आरक्षण विरोधी धोरणामुळे झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या, नाना पटोलेंचा घणाघात
भाजपच्या आरक्षणविरोधी धोरणामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागल्याचा घणाघात पटोले यांनी केलाय. तसंच भाजपनं देश विकण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोपही पटोले यांनी यावेळी केलाय. ते आज विरारमध्ये बोलत होते.
विरार : राज्यातील ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सुरु असलेलं राजकारण थांबण्याचं नाव घेत नाही. सत्ताधारी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप नेत्यांचे एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोप सुरुच आहेत. भाजपच्या आरक्षणविरोधी धोरणामुळेच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागल्याचा घणाघात पटोले यांनी केलाय. तसंच भाजपनं देश विकण्याचा घाट घातल्याचा गंभीर आरोपही पटोले यांनी यावेळी केलाय. ते आज विरारमध्ये बोलत होते. (Nana Patole criticizes BJP over OBC reservation, ZP and Panchayat Samiti elections)
ओबीसींचं राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर लागलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी नाना पटोले हे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर आहेत. वसई तालुक्यातील तिल्हेर गणातील निकिता पाटील आणि भाताने गणातील पांडुरंग जाधव यांच्या प्रचारासाठी पटोले यांनी तिल्हेर इथं पहिली सभा घेतली. त्यावेळी पटोले यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला.
पालघर जिल्हातील जिल्हा परिषद पोटनिवडणुकीमध्ये रिंगणात कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज पारोर येथे उपस्थित मतदारांना, कार्यकर्तोंना संबोधित केले. pic.twitter.com/nxP6KEobQv
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 29, 2021
‘ओबीसी आरक्षण संपवण्याचा भाजपचा घाट’
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लागल्या आहेत, त्याला भाजप कारणीभूत आहे. ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण टिकले पाहिजे यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. तर भाजप मात्र आरक्षण संपवायला निघाला आहे, असा आरोप पटोले यांनी केलाय. देशाला विकून देश चालवण्याचं काम भाजप करत आहे. पण आता भाजपला संपवण्यासाठी आणि देश चालवण्यासाठी एकमेव काँग्रेस पक्ष असल्याचं लोकांना कळायला लागल्याचं पटोले यांनी म्हटलंय.
‘बुलेट ट्रेन ही विशिष्ट लोकांसाठीच’
बुलेट ट्रेन प्रकल्पावरुनही नाना पटोलेंनी भाजपवर टीका केलीय. बुलेट ट्रेन ही विशिष्ट लोकांसाठी आहे. मुंबईला विकायचं आणि सुरतला न्यायचं असा भाजपचा पवित्रा आहे. केंद्र आणि फडणवीस यांच्या दबावातून बुलेट ट्रेन आणण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
एकीकडे स्व. राजीव गांधीजींनी महिलांना सत्तेच्या भागीदारीत आणलं, पुरुषांच्या बरोबरीने उभं केलं तर दुसरीकडे उज्वला योजना आणून तुमच्या घरातले पैसे लुटून मूठभर लोकांकडे पाठवण्याची व्यवस्था मोदी सरकारने केली. हाच नेमका फरक आहे काँग्रेस आणि भाजप विचारधारेतला: प्रदेशाध्यक्ष नाना पटोले pic.twitter.com/EQtjYu1GkD
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) September 29, 2021
अमित शाहांना टोला
भाजपची सत्ता आल्यानंतर माजी भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या मुलाचं उत्पन्न हजार पटीनं वाढलं. अशी काय चादूची कांडी आहे की त्यांचं उत्पन्न इतकं झपाट्यानं वाढलं. ते देशातील तरुणांनाही सांगा म्हणून तरुणांची बेकारी जाईल, असं पत्र आपण अमित शाहांना लिहिल्याचं सांगत पटोले यांनी शाहांना जोरदार टोला लगावलाय.
‘भाजपला दिवसाही स्वप्न पडत आहेत’
काँग्रेसनं महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे आणि तो 5 वर्षे कायम राहील, असा दावाही पटोले यांनी केलाय. तसंच भाजपला दिवसाही स्वप्न पडत आहेत. कधी दिवसा, तर कधी पहाटे ते मंत्री बनतात. त्यांना दिवा स्वप्न पडतात ते आम्ही कशाला आडवा, अशा शब्दात पटोले यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय.
इतर बातम्या :
आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा
Nana Patole criticizes BJP over OBC reservation, ZP and Panchayat Samiti elections