‘पंढरपूर’चा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा: गोपीचंद पडळकर

भाजपने अचूक व्यवस्थापनाच्या जोरावर ही निवडणूक जिंकली होती. त्यामुळे महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला होता. | Gopichand padalkar bjp

'पंढरपूर'चा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा: गोपीचंद पडळकर
गोपीचंद पडळकर, भाजप आमदार
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 12:16 PM

मुंबई: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणारा असल्याचे भाकीत भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand padalkar) यांनी व्यक्त केले. पंढरपूरच्या पोटनिवडणुकी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र असूनही भाजपने अचूक व्यवस्थापनाच्या जोरावर ही निवडणूक जिंकली होती. त्यामुळे महाविकासआघाडीला मोठा धक्का बसला होता. (BJP leader Gopichand padalkar on pandharpur bypoll 2021 results)

या निवडणुकीत भाजपच्या समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरथ भालके यांच्यावर 3700 मतांनी मात केली होती. गेल्या काही महिन्यांत राज्यभरात झालेल्या स्थानिक निवडणुकांमध्ये भाजपला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत होता. मात्र, पंढरपूरची पोटनिवडणूक याला अपवाद ठरली. बड्या नेत्यांच्या प्रचारसभांमुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या या निवडणुकीत अखेर भाजपने बाजी मारली होती. भाजपने महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांना धोबीपछाड देत पंढपूरची निवडणूक जिंकली. त्यामुळे आता भाजप राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ राबवणार असल्याची कुजबूज सुरु झाली होती. ‘तुम्ही पंढरपूरमध्ये भाजपला साथ द्या…मी राज्यात यांचा करेक्ट कार्यक्रम करतो’, अशा आशयाचे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरातील प्रचारसभेत केले होते.

‘पंढरपूरात भगीरथ भालकेंच्या आईला उमेदवारी दिली असती तर…’

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचा पराभव हा लोकांच्या नाराजीमुळे झालेला नाही. तर याठिकाणी रणनीती आखण्यात महाविकासआघाडी थोडीशी कमी पडली. भगीरथ भालके यांच्याऐवजी त्यांच्या आईला उमेदवारी दिली असती तर काम सोपं झालं असतं. मात्र, आम्ही हा निकाल स्वीकारला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी म्हटले होते.

आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलंत, तसं बहुजनांचं पालकत्व स्वीकारा, पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना बोचरं पत्र

मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रमाणे आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांची तातडीने मंत्रिपदी नियुक्ती केली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील बहुजन युवकांचे पालकत्व स्वीकारुन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. (BJP leader gopichand padalkar letter to CM Uddhav Thackeray)

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यात त्याचे पडसाद उमटत आहे. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून काही मागण्या केल्या आहेत.

संबंधित बातम्या:

आदित्य ठाकरेंना मंत्रिपद दिलंत, तसं बहुजनांचं पालकत्व स्वीकारा, पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना बोचरं पत्र

…तोपर्यंत महाविकासआघाडी सरकारला धोका नाही; राष्ट्रवादीच्या नेत्याचा दावा

‘मी करेक्ट कार्यक्रम करतो, पण..’, पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

(BJP leader Gopichand padalkar on pandharpur bypoll 2021 results)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.