Pandharpur by-Poll Result : ना विजयाचा गुलाल, ना हार-सत्कार! नवनियुक्त आमदार कोरोना विरोधातील लढाईसाठी थेट मैदानात

भाजपचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवला. पण या विजयानंतर आमदार समाधान आवताडे यांनी विजयाच्या जल्लोषात न रमता थेत कामाला घात घातल्याचं आज पाहायला मिळालं.

Pandharpur by-Poll Result : ना विजयाचा गुलाल, ना हार-सत्कार! नवनियुक्त आमदार कोरोना विरोधातील लढाईसाठी थेट मैदानात
नवनियुक्त आमदार समाधान आवताडे यांच्याकडून कोरोना स्थितीचा आढावा
Follow us
| Updated on: May 03, 2021 | 5:35 PM

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांचा पराभव करत भाजपचे समाधान आवताडे यांनी विजय मिळवला. पण या विजयानंतर आमदार समाधान आवताडे यांनी विजयाच्या जल्लोषात न रमता थेत कामाला घात घातल्याचं आज पाहायला मिळालं. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध राजकीय पक्षाच्या बड्या नेत्यांनी मोठ्या सभा घेतल्या. त्यानंतर पंढरपूर आणि मंगळवेढा परिसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. अशावेळी आमदार समाधान आवताडे हे विजयानंतर थेट कोरोनाविरोधातील लढाईसाठी मैदानात उतरले आहेत. (BJP MLA Samadhan Avtade reviews the situation of Corona after winning the by-election)

कोरोना स्थितीचा आढावा

समाधान आवताडे यांनी आज तातडीने पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या दालनात अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मतदारसंघातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारकही उपस्थित होते. त्याचबरोबर कोरोना लस आणि रेमडेसिव्हीर इंजेक्शनबाबतही माहिती घेतली. त्यानंतर आमदार आवताडे यांनी सर्व अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देत आरोग्य यंत्रणेला गती देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर उजनी धरणातील 5 टीएमसी पाण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचंही आवताडे यांनी यावेळी सांगितलं.

समाधान आवताडे यांनी यापूर्वी दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पोटनिवडणुकीत मात्र त्यांचा विजय झाला. या विजयानंतर आवताडे यांनी विजयी गुलाल, हारतुरे, सत्कार समारंभ यात वेळ दवडला नाही. इतकंच नाही तर कुठे फटाके किंवा जल्लोष न करता त्यांनी थेट कामाला हात घातल्याचं पाहायला मिळत आहे. विजयानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी कोरोना स्थितीचा आढावा घेत अधिकारी आणि आरोग्य यंत्रणेला गती देण्याचं काम केलं आहे.

महाविकास आघाडीला भाजपचा दणका

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला दणका दिला. भाजपचे समाधान आवताडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे भगीरथ भालके यांचा पराभव केला. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या आणि राष्ट्रवादीसह भाजपनेही प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडली. यामध्ये भाजप उमेदवर समाधान आवताडे हे 3733 मतांनी विजयी झाले. त्यांच्या या विजयामुळे भाजपमध्ये चैतन्य निर्माण झाले असून यापुढेसुद्धा भाजप अशाच प्रकारे महाविकास आघाडीशी दोन हात करेल, असे भाजप नेत्यांकडून सांगितले जात आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके विजयी होणार की भाजपचे उमेदवार समाधान आवताडे बाजी मारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर अटीतटीच्या या लढतीत समाधान आवताडे यांनी बाजी मारली.

?भाजप : समाधान आवताडे : 109450 विजयी  ?राष्ट्रवादी : भगीरथ भालके : 105717 पराभूत

संबंधित बातम्या :

“भारतनाना माफ करा, सैनिकांच्या पत्नीचा अपमान करणारी प्रवृत्ती जिंकली”

Abhijit Bichukale | अभिजीत बिचुकलेंचं डिपॉझिट पुन्हा जप्त, पंढरपूर पोटनिवडणुकीत ‘नोटा’लाही अधिक मतं

‘मी करेक्ट कार्यक्रम करतो, पण..’, पंढरपूर पोटनिवडणुकीच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

BJP MLA Samadhan Avtade reviews the situation of Corona after winning the by-election

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.