पंढरपूर: राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमधील लढाईमुळे अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Pandharpur Bypoll) दररोज नवनवे ट्विस्ट येत आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेससाठी शिवसेनेने (Shivsena) आपल्याच पक्षातील नेत्याची हकालपट्टी केल्याची माहिती समोर आली आहे. (Shivsena expelled own leader in Pandharpur bypoll 2021)
शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका शैला गोडसे यांनी या पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्याविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यामुळे महाविकासआघाडीत बिघाडी होण्याची शक्यता होती. त्यामुळे शिवसेनेने शैला गोडसे यांना सरळ बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
राष्ट्रवादीचे माजी आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर होणारी पोटनिवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. सांगली आणि जळगाव महानगरापालिकेत ओढावलेल्या नामुष्कीनंतर भाजपने आता पंढरपुरात संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावायची ठरवली आहे. त्यासाठी भाजपकडून समाधाना आवताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तर राष्ट्रवादीने भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना उमेदवारी दिली आहे. दोन्ही उमेदवारांचे अर्ज आज दाखल करण्यात आले. यानिमित्ताने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी एकमेकांना आव्हान-प्रतिआव्हानही दिले आहे.
महाविकास आघाडीच्या सर्व घटकांचा भगीरथांना आशीर्वाद आहे. जेव्हापासून महाविकास आघाडी आली आहे, भाजपचा कुठेही विजय झालेला नाही. सगळे एकत्र आल्यावर भाजपचा पराभव होतो ही काळ्या दगडावरची रेघ आहे. म्हणूनच काहींनी भाजपची उमेदवारी घेतली नाही. फडणवीसांनी उमेदवार देणार नाही असं सांगितलं होतं. आपण तीन तारखेपर्यंत वाट पाहू. फडणवीसांवर आताच अविश्वास दाखवणं योग्य होणार नाही, असं जयंत पाटील यांनी सांगितले होते.
17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी गुलाल
अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021
>> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021
>> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021
>> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021
>> मतदान – 17 एप्रिल 2021
>> निवडणूक निकाल – 2 मे 2021
संबंधित बातम्या
बारामतीत डिपॉझिट जप्त, तरीही मी आमदार झालो, समाधान आवताडेही होईल : गोपीचंद पडळकर
पवारसाहेब काळजी करु नका, पंढरपूरचा कार्यक्रम आमचा आम्ही करतो : जयंत पाटील
जयंत पाटलांच्या वक्तव्याने पंढरपूर पोटनिवडणुकीत ट्विस्ट, फडणवीस उमेदवार मागे घेणार?
(Shivsena expelled own leader in Pandharpur bypoll 2021)