Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pandharpur Garmpanchayat election : गुलाल लागला, पठ्ठ्यानं 20 कि.मी. दंडवत घातला, पंढरपुरातून एक नंबर बातमी

पंढरपूर तालुक्यातील सुपली गावच्या एका पठ्ठ्यानं ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तब्बल 20 किलोमीटर दंडवत घालत विठ्ठलाच्या दारात नवस फेडला.

Pandharpur Garmpanchayat election : गुलाल लागला, पठ्ठ्यानं 20 कि.मी. दंडवत घातला, पंढरपुरातून एक नंबर बातमी
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 5:48 PM

पंढरपूर : राज्याच्या राजकारणापेक्षा गावगाड्याचं राजकारण सोपं नाही असं म्हणतात. मग ग्रामपंचायत निवडणुकीत जिंकून येण्यासाठी काही उमेदवार अनेक पर्यायांचा वापर करतात. मग त्यात साम, दाम, दंड, भेद या नितीचाही वापर केला जातो. तर काही उमेदवार निवडून येण्यासाठी देवदेवतांना नवस बोलतात. पंढरपूर तालुक्यातील सुपली गावच्या एका पठ्ठ्यानं ग्रामपंचायत निवडणुकीनंतर तब्बल 20 किलोमीटर दंडवत घालत विठ्ठलाच्या दारात नवस फेडला.(paid homage to vitthal by bowing for 20 km)

पंढरपूर तालुक्यातील सुपली गावचे ग्रामस्थ वामन कुलकर्णी यांनी सुपली ते पंढरपूर असं तब्बल 20 किलोमीटर अंतर दंडवत घालत पूर्ण केलं आहे. सुपली ग्रामपंचायत निवडणुकीत बी. वाय. अॅग्रोचे बाळासाहेब यलमार यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत हनुमान ग्रामविकास पॅनल उभा केला होता. 9 सदस्यसंख्या असलेल्या या ग्रामपंचायतीत सर्व सदस्य हनुमान ग्रामविकास पॅनलचेच निवडून आले. ग्रामपंचायत निवडणुकीत विजय मिळावा यासाठी वामन हनुमान ग्रामविकास पॅनलनं विठ्ठला चरणी साकडं घातलं होतं. हा नवस वामन कुलकर्णी यांनी पूर्ण केला आहे. त्यांनी सुपली ते पंढरपूर हे 20 किलोमीटरचं अंतर दंडवत घालून पूर्ण केलं. संत नामदेव महाराज पायरीजवळ दर्शन घेऊन त्यांनी हा नवस पूर्ण केला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लोक काय काय करतील हे सांगता येत नसल्याचंच पुन्हा दिसून आलं आहे.

कोल्हापुरात साफसफाई करणाऱ्या आजीबाईंचा विजय

ग्रामपंचायत निवडणुकीत काय घडेल याचा अंदाज शक्यतो कुणी बांधू शकत नाही. त्याचाच प्रत्यय कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी गावात आलाय. गावातील लोकांनी 40 वर्ष सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्या आजीला ग्रामपंचायतीवर निवडून आणले आहे. द्रौपदी सोनूले असे या निवडून आलेल्या आजींचं नाव आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्या गडमुडशिंगी गावच्या सदस्या बनल्यात. ते ही गावाच्या माजी सरपंचांच्या पत्नीला धूळ चारून. गावातील लोकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळेच द्रौपदी सोनूले ही कामगिरी करु शकल्या.

40 वर्ष गावची स्वच्छता करणाऱ्या, गटार साफ करणाऱ्या द्रौपदी आजी आता सन्मानानं सदस्य म्हणून ग्रामपंचायती मध्ये जाणार आहेत. ग्रामपंचायतीमध्ये वीस रुपये महिना पगार असल्यापासून काम करणाऱ्या आजींना आता सदस्य झाल्याचा अतिश्य आनंद झाला आहे. मात्र, यापुढेही आपण गावची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित बातम्या : 

यशस्वी स्त्रीच्या मागे, खंबीर पुरुषाचाही हात असतो, महाराष्ट्रात व्हायरल होणाऱ्या फोटोमागची कहाणी!

कोल्हापूरकरांचा नाद करायचाच नाही; माजी सरपंचाच्या पत्नीला धूळ चारुन साफसफाई करणाऱ्या आजीबाईंचा विजय

paid homage to vitthal by bowing for 20 km

त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय
त्याच्या जीवाला धोका तर..,कामराच्या जबाब नोंदवण्यावरुन कोर्टाचा निर्णय.
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी
'..तर शिवजयंतीला देशभर सुट्टी द्या',निर्धार मेळाव्यातून ठाकरेंची मागणी.
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात
'ती बाई साधी नाही...मोदींची बहीण, नाव लक्षात ठेवा...', राऊतांचा घणाघात.
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले...
'...उनपर है धिक्कार', नाशिकच्या निर्धार शिबिरातून संजय राऊत म्हणाले....
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका
'चावलेला कुत्रा 'वाघ्या' तर..', मिटकरींची भिडेंवर नाव न घेता खोचक टीका.
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल
अजितदादांनी 2024 ची निवडणूक 'गद्दार'वर लढवली...कामराच्या वकिलांचा सवाल.
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत
भिडेंना चावणारं कुत्रं शोधण्यासाठी यंत्रणेची अहोरात्र मेहनत.
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा
संभाजीनगरमध्ये मध्यरात्री 2 गटात राडा.
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?
सामंत अन् भुमरेंनी घेतली जरांगेंची भेट, कारण काय? काय झाली चर्चा?.
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार
वर्ष अखेरपर्यंत मुंबईकरांच्या सेवेत आणखी एक मेट्रो येणार.