Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा तुफान ! भर पावसात जयंत पाटलांची सभा, लोकांना शरद पवारांची आठवण

भर पावसात जयंत पाटील यांनी सभा दणाणून सोडल्यामुळे अनेकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आठवण झाली. (jayant patil pandharpur rain speech)

पुन्हा तुफान ! भर पावसात जयंत पाटलांची सभा, लोकांना शरद पवारांची आठवण
JAYANT PATIL RAIN SPEECH
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 9:57 PM

पंढरपूर : सध्या पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचा प्रचार बहरात आला आहे. भाजप तसेच राष्ट्रवादीचे बडे नेते आपापल्या उमेदवाराच्या विजयासाठी जीवाचं रान करत आहेत. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांच्या रोज येथे सभा होत आहेत. आज (11मार्च) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ पंढरपूर मतदारसंघात सभा घेतली. नेहमीची सभा असती तर याकडे कदाचित लोकांचे लक्षसुद्धा गेले नसते. मात्र, भर पावसात जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सभा दणाणून सोडली आहे. त्यांची सभा आणि भाषण पाहून अनेकांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( Sharad Pawar) यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झालीये. जयंत पाटलांच्या या सभेच्या निमित्ताने पवारांनी साताऱ्यातील सभेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्याचे लोक सांगतायत. (Pandharpur Jayant Patil holds speech in rain people remembering Sharad Pawar speech of Satara)

पाऊस आला अन् पाटलांनी सभा दणाणून सोडली

विधानसभा निवडणुकीसोबतच सातारा लोकसभा पोटविधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने 2019 साली शरद पवार यांनी भर पावसात साताऱ्यात सभा घेतली होती. अंगावर कोसळणारा पाऊस, डोक्यावर विजांचा कडकडाट असा सगळा माहोल असताना तसूभरही विचलीत न होता पवारांनी ही सभा दाणाणून सोडली होती. 80 वर्षीय शरद पवार यांची ही सभा ऐतिसहासिक असल्याचे अजूनही सांगितले जाते. त्यांच्या याच सभेमुळे बेडे नेते सोडून गेलेले असूनसुद्धा राष्ट्रवादीने 2019 च्या विधानसभेत मोठी कामगिरी करुन दाखवली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते भारत भालके यांच्या निधनांतनर पंढरपूर मतदारसंघाची पोटनिवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीर जयंत पाटलांनीसुद्धा भर पावसात जंगी सभा घेतली आहे. जयंत पाटील सभेत भाषण करत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. विजासुद्धा कडाडत होत्या. मात्र, डोक्यावर पावसाच्या धारा पडताना जयंत पाटीलसुद्धा तिळमात्र विचलीत झाले नाहीत. त्यांनी सभेत उभं राहत आपलं भाषण पूर्ण केलं. त्यांनी सभा दणाणून सोडली.

लोकांना शरद पवारांची आठवण

जयंत पाटील यांची आजची भर पावसातली सभा पाहून अनेकांना शरद पवारांच्या 2019 मधील साताऱ्यातील सभेची आठवण झाली आहे. भर सभेत पाऊस येणे म्हणजे पवारांच्या साताऱ्याच्या सभेची पुनरावृत्ती असून हा तर शुभसंकेतच आहे, असे अनेकांनी म्हटलंय. तर काहींनी हे तर शरद पवार यांच्या पावलांवर पाऊल ठेवणं असून जलसंपदा मंत्र्याच्या अंगावर पावसाची वृष्टी होतेय असं या सभेचं वर्णन केलंय.

पाहा व्हिडीओ :

सभेत जयंत पाटील काय म्हणाले ?

दरम्यान,  जयंत पाटील यांनी भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित केली होती. यावेळी त्यांनी भगिरथ भालके यांचाच विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला. “मंगळवेढ्याला जास्तीतजास्त पाणी मिळावे यासाठी भारत भालके 2009 पासून पाठपुरावा करत होते. भाजप सरकारच्या काळात या मतदारसंघाचे पाणी गायब केले गेले. आपले सरकार आले त्यावेळी मला मंत्री केले नाही तरी चालेल पण माझ्या मतदारसंघाला पाणी द्या, अशी भूमिका घेतली होती. योगायोगाने जलसंपदा मंत्री झाल्यावर आणि आचारसंहिता लागण्याआधीच आपल्या तालुक्याला दोन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. इथल्या खासदारांनी गाव दत्तक घेतले मात्र ते कधीच फिरकले नाहीत. परंतु भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांना सुजलाम सुफलाम करण्याचा मानस आहे,” असे जयंत पाटील म्हणाले.

इतर बातम्या :

Sharad Pawar Satara Rain Speech | भरपावसातील शरद पवारांच्या सभेची वर्षपूर्ती, राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचलं

पवारांकडून आधी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संधी, आता वडिलांच्या जागी तिकीट, कोण आहेत भगीरथ भालके?

(Pandharpur Jayant Patil holds speech in rain people remembering Sharad Pawar speech of Satara)
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
'...तेव्हा कोकणाला काय दिलं?', एकच सवाल अन् राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा
मुंबईतील वाहतुकीचे पर्याय अधिक सक्षम होणार! फडणवीसांची मुंबईसाठी घोषणा.
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात
'माझ्या वक्तव्यावर मी ठाम', मंगेशकर कुटुंबीयांवर वडेट्टीवारांचा घणाघात.
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द
मुंबईकरांनो 'या' मार्गावरून प्रवास करताय? मेगाब्लॉकमुळे 334 लोकल रद्द.
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट
एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात परिवहन मंत्र्यांकडून मोठी अपडेट.
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल
रुग्णला अमृत पाजलं का? शिंदेंच्या आमदारानं डॉक्टरला झापलं,ऑडिओ व्हायरल.
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?
पुणे गर्भवती मृत्यू प्रकरण; तिसरा अहवाल सरकारला सादर, काय म्हटलंय?.
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण
इम्तियाज जलील - उद्धव ठाकरेंची भेट; अंबादास दानवेंनी सांगितलं कारण.
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक
सर्वांना हिशेब इथेच होणार, 'त्या' आठवणीने नितेश राणे भावुक.
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्
एसटी कर्मचाऱ्यांची थट्टा सुरूच, इतिहासात पहिल्यांदाच अर्धाच पगार अन्.