पार्थ पवार की भगीरथ भालके? पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये राजकीय पेच

पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांनी बाहेरील उमेदवाराला विरोध दर्शवला आहे. (Pandharpur Mangalwedha Constituency)

पार्थ पवार की भगीरथ भालके? पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये राजकीय पेच
Follow us
| Updated on: Dec 28, 2020 | 2:57 PM

सोलापूर : दिवंगत आमदार भारत नाना भालके (Bharat Bhalke) यांच्या मृत्यूनंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. तर पंढरपूर येथे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या नावाचा आग्रह स्थानिक पातळीवर होताना दिसत आहे. यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघांमध्ये मोठा राजकीय पेच निर्माण झाला आहे. पंढरपूर येथील स्थानिक नागरिकांनी बाहेरील उमेदवाराला विरोध दर्शवला आहे. (Pandharpur Mangalwedha Constituency Demand for Bhagirath Bhalke As A candidature)

राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांनी 2019 मधील मावळ मतदारसंघांतून लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यात त्यांचा दारुण पराभव झाला होता. पार्थ यांच्या बाजूने पवार घराण्याची मोठी राजकीय ताकद आहे. 2019 च्या पराभवानंतर पार्थ पवार हे राज्याच्या राजकारणामध्ये कुठेही सक्रिय होताना दिसले नाहीत. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभामधून राष्ट्रवादी काँग्रेस आमदारकी देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र गाव पातळीवर पार्थ पवार यांच्या उमेदवारीला विरोध होताना दिसत आहे. राजकीय जाणकारांकडूनही पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत अफवा असल्याचं बोलले जात आहे.

“पंढरपूर मतदारसंघांतून पार्थ पवार यांची उमेदवारी ही केवळ अफवा आहे. मात्र पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीमध्ये भालके कुटुंबाला स्थान मिळणे अपेक्षित असल्याची त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे. भारत नाना भालके यांच्या अकाली निधनामुळे मतदारसंघांमध्ये सहानुभूतीची लाट आहे. पार्थ पवार यांच्या उमेदवारीवरुन पवार कुटुंबियांना बदनाम करण्याचे कटकारस्थान दिसत आहे. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनानंतर तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघांमधून त्यांच्या पत्नी यांना उमेदवारी दिली होती, याची आठवणही कार्यकर्ते करून देत आहेत. त्यामुळे उमेदवारांना स्थानिकच असला पाहिजे, अशी त्यांची भावना आहे”, असं ज्येष्ठ पत्रकार अशोक गोडगे यांनी नमूद केलं.

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघासाठी पार्थ पवार यांच्या उमेदवारीची चर्चा आहे. मात्र ही चर्चा प्रसारमाध्यमे आणि वर्तमानपत्रातून होताना दिसत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून या उमेदवारीबाबत पूर्णत: खंडन करण्यात आले आहे. 2009 मध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनाही राष्ट्रवादीने पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात उमेदवारी दिली होती. मात्र स्थानिक असलेल्या भारत नाना भालके यांनी त्यांचा दारुण पराभव केला होता. त्यामुळे स्थानिक उमेदवाराला प्रथम पसंती असेल. त्यामुळेच पार्थ पवार यांना उमेदवारी देण्याची चूक राष्ट्रवादी करणार नाही, किंबहुना ही फक्त अफवा असेल, असं पत्रकार महेश खिस्ते यांनी सांगितलं.

?कोण आहेत भगीरथ भालके

▶️भगीरथ हे भारत भालके यांचे सुपुत्र आहेत ▶️दहा वर्षापासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक आहेत ▶️भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेले कारखान्याचे अध्यक्षपद भगीरथ भालके यांच्याकडे देण्यात आलं ▶️2017 मध्ये कासेगाव जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवली होती त्यात त्यांचा पराभव झाला होता.

(Pandharpur Mangalwedha Constituency Demand for Bhagirath Bhalke As A candidature)

संबंधित बातम्या : 

Parth Pawar | भारत भालकेंच्या जागेवर पार्थ पवारांना संधी मिळणार?

Parth Pawar : पार्थ पवारांसाठी पंढरपूर मतदारसंघाचं गणित कसं असेल?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.