शेतकरी हा कुचेष्टेचा विषय नव्हे; शहाजीबापू पाटील यांनी अजित पवार यांना सुनावलं

Shahajibapu Patil on Ajit Pawar : अजित पवार यांचं वक्तव्य अन् शेतकऱ्यांचा अपमान; शहाजीबापू पाटील नेमकं काय म्हणाले?

शेतकरी हा कुचेष्टेचा विषय नव्हे; शहाजीबापू पाटील यांनी अजित पवार यांना सुनावलं
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 3:04 PM

पंढरपूर : शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शेती करण्याच्या चेष्टावरून आमदार शहाजीबापू पाटील यांनी अजित पवार यांना सुनावलं आहे. अजित पवार यांनी सर्वसामान्य शेतकऱ्याची कुचेष्टा केली आहे. शेतकरी हा कुचेष्टेचा विषय नव्हे. शेतकऱ्यांबद्दल असं बोलणं योग्य नाही , असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.

कावीळ दोन प्रकारची असते. संजय राऊत यांना पांढरी कावीळ झाली आहे. ही पांढरी कावीळ संजय राऊत यांच्या पोटात गेलीये. संजय राऊत कर्नाटकमध्ये प्रचार करणं योग्य आहे, असं शहाजीबापू म्हणालेत.

संजय राऊत शिंदेंच्या शिवसेनेवर टीकास्त्र डागतात. खोके सरकार असा ते वारंवार उल्लेख करतात. 50 खोके एकदम ओकेच्या घोषणाही वारंवार दिल्या जातात. त्यावर शहाजीबापू पाटील बोललेत. संजय राऊत ही कुठली यंत्रणा आहे का? संजय राऊतांना खोक्यांशिवाय काही दिसत नाही. आता काही दिवसात खोके म्हणत संजय राऊत रस्त्यावर हिंडतील, अशी टीकाही शहाजीबापू पाटील म्हणाले आहेत.

सत्तासंघर्षावर लवकरच सुनावणी होईल, असं बोललं जात आहे. त्यावर शहाजीबापू यांनी मत व्यक्त केलंय. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर भाष्य करणं, अंदाज व्यक्त करणं कायद्यापलीकडचं आहे. दोन वकीलांबरोबर बोललो. पण कायदा आणि न्यायालयाच्या निकालावर अंदाज व्यक्त करणं योग्य नाही. न्यायालय योग्य तो निर्णय देईल, असं शहाजीबापू म्हणाले आहेतय

कर्नाटकमध्ये निवडणूक होतेय. आज मतदानदान पार पडतंय. जनतेची मतं मतपेटीत बंद होत आहेत. ही एका राज्याची निवडणूक आहे. अशाने देशाचं गणित बिघडेल असं म्हणत असाल तर त्यांचा अभ्यास कमी आहे, असं शहाजीबापू पाटील म्हणालेत.

शरद पवारसाहेब शिंदे-फडणवीस सरकारबद्दल जे मत आहे ते दुरून असणारं मत आहे. जे निर्णय होतात शिंदे साहेब फडणवीस संयुक्त विचाराने होतात. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असं म्हणत त्यांनी विरोधकांना उत्तर दिलं आहे.

वज्रमूठ व्यवस्थित बांधली गेलेली नाही. अशातच महाविकास आघाडीत वेगवेगळ्या घटना घडत आहेत. त्यांच्यातील मतभेद दिसत आहेत. काँग्रेस, ठाकरेगट आणि राष्ट्रवादी हे वेगवेगळ्या तीन विचारांचे पक्ष एकत्र आलेले आहेत. त्याच्यात वैचारिक भिन्नचा आहे. त्यामुळे या महाविकास आघाडीत लवकरच बिघाड होईल, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.