पंढरपूरचे ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांना कोरोना, ‘मोठ्या मालकांसाठी प्रार्थना करा’, नातवाची भावूक पोस्ट
सुधाकरपंत परिचारक यांचे नातू आणि प्रशांत परिचारक यांचे पुत्र प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट केली आहे.
पंढरपूर : “गेल्या पन्नास वर्षापासून ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता, ते ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे” असे आवाहन नातू प्रितीश प्रशांत परिचारक यांनी केले आहे. 85 वर्षीय सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण झाल्याने पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. (Pandharpur Senior Leader Sudhakar pant Paricharak tested Corona Positive treatment in Pune Hospital)
लोकनेते सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची बाधा झाली, तेव्हापासून त्यांच्यावर प्रेम करणारा प्रत्येक जण अस्वस्थ आहे. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी कोणी देवाला नवस केले आहेत तर कोणी व्रत उपासना सुरु केले आहेत. अनेकांच्या मनात देवाच्या जागी सुधाकरपंत परिचारक यांना स्थान आहे. सुधाकरपंत परिचारक यांचे नातू आणि प्रशांत परिचारक यांचे पुत्र प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवर ही भावनिक पोस्ट केली आहे.
काय आहे पोस्ट?
“गेल्या काही दिवसांपासून पंढरपुरात पसरलेल्या कोरोनाच्या साथीमध्ये सामाजिक जाणिवेतून काम करत असताना परिचारक कुटुंबातील अनेक जणांना कोरोना विषाणूची बाधा झालेली आहे. सर्व जण त्यांच्या लक्षणांनुसार योग्य ते उपचार घेत आहेत. सर्व जण डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून व गरज भासल्यास COVID विलगीकरण वॉर्डमध्ये यशस्वी उपचार घेत आहेत.
आपल्या सर्वांचे दैवत असलेल्या मोठ्या मालकांवर (सुधाकरपंत परिचारक) पुण्यात सह्याद्री हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून सर्वोत्तम उपचार चालू आहेत. वृद्धापकाळ, पूर्वीचे साखर आणि रक्तदाब यासारखे आजार आणि नव्याने उद्भवलेला COVID न्यूमोनिया यामुळे त्यांची ही कोरोनाची लढाई कठीण होत आहे. गेली 50 वर्षे ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता त्यांना आज आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे. त्यांच्या इच्छाशक्तीवर आणि आपल्या प्रार्थनेच्या बळावर ते ही लढाईही जिंकतील अशी आशा करुयात. वकील साहेब, प्रशांत मालक, उमेश काका, प्रणव दादा व इतर सर्व परिचारक कुटुंबियांची प्रकृती स्थिर आहे.” अशी माहिती प्रितीश यांनी दिली आहे.
(Pandharpur Senior Leader Sudhakar pant Paricharak tested Corona Positive treatment in Pune Hospital)
सुधाकरपंत परिचारक यांचा परिचय
सुधाकरपंत परिचारक यांनी 2019 मध्ये शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.
सुधाकरपंत परिचारक हे दहा वर्ष राष्ट्रवादीचे आमदार होते. 2009 मध्ये सुधाकरपंत परिचारक यांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी जाहीरही झाली होती. मात्र ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी पंतांनी उमेदवारी मागे घेतली. परंतु मोहिते पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला.
गेल्या दहा वर्षांच्या काळात सुधाकरपंत निवडणुकांपासून लांब राहिले. पंचाहत्तरी गाठल्यानंतर इतरांना संधी देण्यासाठी सुधाकरपंतांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ करणं पसंत केलं होतं. 2014 च्या निवडणुकीपासून परिचारकांनी राष्ट्रवादीसोबतही काडीमोड घेतला. मात्र कार्यकर्त्यांचा जोश पाहून गेल्या वर्षी सुधाकरपंतांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. सुधाकरपंत हे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते आहेत. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. भाजपने तिकीट न दिल्यास अपक्ष लढा, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते, मात्र भाजपने त्यांना तिकीट दिल्याने सुधाकरपंत रिंगणात उतरले.
खासदार नवनीत कौर राणा यांना लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज, पुढील 20 दिवस क्वारंटाईन राहणारhttps://t.co/j8yHbjvXG0 #Corona
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 17, 2020
(Pandharpur Senior Leader Sudhakar pant Paricharak tested Corona Positive treatment in Pune Hospital)