गोपीनाथ मुंडेंना सोडून गेलेला एक-एक नेता पंकजा मुंडेंनी परत आणला
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Pankaja Gopinath Munde) यांना सोडून जाणारे नेते पुन्हा एकदा पंकजा मुंडेंच्या (Pankaja Gopinath Munde) नेतृत्त्वात भाजपात येत आहेत. मुंदडा कुटुंबीयही पुन्हा भाजपात आल्याने पक्षाची ताकद वाढणार आहे.
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः उमेदवारी जाहीर केल्यानंतरही नमिता मुंदडा यांनी भाजपात प्रवेश केला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या बेरजेच्या राजकारणाला पुन्हा एकदा यश आलं. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (Pankaja Gopinath Munde) यांना सोडून जाणारे नेते पुन्हा एकदा पंकजा मुंडेंच्या (Pankaja Gopinath Munde) नेतृत्त्वात भाजपात येत आहेत. मुंदडा कुटुंबीयही पुन्हा भाजपात आल्याने पक्षाची ताकद वाढणार आहे. तर केजच्या विद्यमान आमदार संगिता ठोंबरे यांचा पत्ता कट झाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे.
बीड जिल्ह्यात मुंडे बहीण-भावात नेहमीच संघर्ष असतो. रक्ताचं नात असलं तरीही अत्यंत टोकाला पोहोचल्यामुळे दोन्ही बहीण-भावात साधा संवादही होत नाही. पण राजकीय लढाईत पंकजा मुंडे (Pankaja Gopinath Munde) धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा भारी पडल्याचं दिसून आलंय. शिवाय दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे जुने सहकारी पुन्हा एकदा पंकजा मुंडेंसोबत काम करताना दिसत आहेत.
पंकजा मुंडेंचं बेरजेचं राजकारण
पंकजा मुंडे (Pankaja Gopinath Munde) यांनी त्यांची सर्वात मोठी राजकीय खेळी बीड जिल्हा परिषद निवडणुकीत दाखवली. राष्ट्रवादीपेक्षा कमी सदस्य असतानाही त्यांनी भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडून आणला. यावेळी तेव्हा राष्ट्रवादीत असलेले माजी मंत्री सुरेश धस यांची मोठी मदत झाली.
गोपीनाथ मुंडेंना सोडून गेलेले सहकारी पुन्हा भाजपात
गोपीनाथ मुंडे (Pankaja Gopinath Munde) यांचं फक्त जिल्ह्याच्याच नव्हे, तर राज्याच्या राजकारणावर वर्चस्व होतं. पण अनेकदा जवळचेच सहकारी सोडून गेल्याने त्यांना राजकीय त्रास सहन करावा लागला. पण पंकजा मुंडेंच्या बेरजेच्या राजकारणात पुन्हा एकदा भाजप सोडलेले नेते भाजपात येत आहेत.
यात पहिला क्रमांक म्हणजे मुंदडा कुटुंबीय. दिवंगत नेत्या विमलताई मुंदडा या दोन वेळा भाजपच्या आमदार होत्या. पण नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि त्या तीन वेळा राष्ट्रवादीच्या आमदार राहिल्या. यावेळी मुंदडा कुटुंबीयांनी पुन्हा भाजपात प्रवेश केलाय.
सुरेश धस यांचीही भाजपात घरवापसी झाली. 2007 ला जिल्हा परिषदेतील सत्तांतरावरुन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोपीनाथ मुंडे उपोषणाला बसले होते. अडीच वर्षानंतर अध्यक्षपदाची निवड होती. त्यावेळी सुरेश धस यांनी बंडखोरी करत सत्तांतर घडवून राष्ट्रवादीची सत्ता आणली. त्यानंतर सुरेश धस भाजपातून बाहेर पडले. यानंतर प्रकाश सोळंके यांनीही गोपीनाथ मुंडेंची (Pankaja Gopinath Munde) साथ सोडली.
यापैकी सुरेश धस यांनी भाजपला जिल्हा परिषद जिंकवून देत भाजपात कमबॅक केलं. 2007 ला गोपीनाथ मुंडे यांना झालेल्या वेदना त्यांचे समर्थक विसरले नव्हते. शिवाय 2014 ची लोकसभा निवडणूकही सुरेश धस गोपीनाथ मुंडेंविरोधातच लढले होते. पण यानंतर सुरेश धस यांनी राष्ट्रवादीतील सदस्यांचा भाजपला पाठिंबा मिळवून दिला आणि पंकजा मुंडे (Pankaja Gopinath Munde) यांच्या जिल्ह्यातील राजकारणातील एक महत्त्वाचा प्रसंग अधोरेखित केला.
माजी मंत्री प्रकाश सोळंकेही पुन्हा भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. पण स्थानिक समीकरणे पाहता पंकजा मुंडे त्यांना पक्षात घेणार का हा मोठा प्रश्न आहे.
रमेश आडसकर यांनीही गोपीनाथ मुंडेंची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यांनी राष्ट्रवादीकडून 2009 ला गोपीनाथ मुंडेंविरोधात लोकसभा लढवली. पण पराभवानंतर ते पुन्हा भाजपात आले.
बीड जिल्ह्यात धनंजय मुंडेंना पुन्हा धक्का
जास्त सदस्य असूनही जिल्हा परिषद गमवावी लागल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर मोठी नामुष्की ओढावली होती. यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या विधानपरिषदेच्या जागेसाठीही राष्ट्रवादीला पराभवाचा सामना करावा लागला. यावेळी धनंजय मुंडेंनी भाजपचे रमेश कराड यांना उमेदवारीची घोषणा केली. पण रमेश कराड यांनी राष्ट्रवादीवर गंभीर आरोप करत पुन्हा घरवापसी केली.
गेल्या पाच वर्षात धनंजय मुंडेंना जिल्ह्यातील जुने नेते एकसंध ठेवण्यात अपयश आल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित झालं. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे जुने नेते जयदत्त क्षीरसागर आणि सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप करत पक्ष सोडला होता.
केजमधील मुंदडा कुटुंबाचं गेली अनेक वर्ष जिल्ह्यात वर्चस्व होतं, पण अंतर्गत कुरघोडींमुळे त्यांनी पक्ष सोडल्याची चर्चा आहे. जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे यांच्यावर आपल्याला डावलल्याचा आरोप मुंदडा कुटुंबीयांचा आहे.
मुंदडा कुटुंबीयांच्या भाजप प्रवेशामुळे केज मतदारसंघात भाजपची पकड अजून मजबूत झाली आहे. याशिवाय जिल्हा परिषदेत भाजप आणखी मजबूत होईल, अंबाजोगाई, केज, धारुर या राष्ट्रवादीचं वर्चस्व असलेल्या भागात भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. एकेकाळी बीड जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, पण आज घडीला राष्ट्रवादीचा जिल्ह्यात एकही आमदार नाही, शिवाय झेडपी भाजपच्या ताब्यात असून विधानपरिषदेवर भाजपचा आमदार आहे.