बीडकरांना भारावून टाकणारं चित्रं, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर

राजकीय धामधुमीनंतर आज (17 जानेवारी) सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे  एकाच व्यासपीठावर पाहायला (Pankaja munde dhananjay munde together) मिळाले.

बीडकरांना भारावून टाकणारं चित्रं, धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकाच मंचावर
Follow us
| Updated on: Jan 17, 2020 | 6:13 PM

बीड : राजकीय धामधुमीनंतर आज (17 जानेवारी) सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे  एकाच व्यासपीठावर पाहायला (Pankaja munde dhananjay munde together) मिळाले. वामनभाऊ यांच्या 44 व्या पुण्यतिथी निमित्त हे दोघेही एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. राज्यातील विधानसभा निवडणुकानंतर पहिल्यांदाच मुंडे भाऊ-बहीण एकाच व्यापीठावर पाहायला मिळाले.

गहिणीनाथ गडावर वामनभाऊ यांच्या 44 वी पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमानिमित्ताने पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. त्याशिवाय खासदार प्रीतम मुंडेही या कार्यक्रमाला हजर होत्या. या कार्यक्रमादरम्यान धनंजय मुंडेंनी भाषणही केले. मात्र निवडणुकांच्या रणधुमाळीच्या आरोप प्रत्यारोपानंतर पहिल्यांदाच पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे एकत्र आले. हे चित्र कैद करण्यासाठी दोघांच्या समर्थकांनी गर्दी केली होती.

राज्यातील हायप्रोफाईल लढतीचा जिल्हा म्हणजे बीड विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे. यंदा बीडमध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या चुलत भावंडांमध्ये लढत झाली. पंकजा आणि धनंजय या दोघांमध्ये नेहमीच वाक्-युद्ध रंगतं. निवडणुकांच्या प्रचारावेळीही त्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या. विधानसभेत धनंजय मुंडेंनी पंकजा मुंडेंचा पराभव केला.

या पराभवानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीतील गोपीनाथ गडावर बहुप्रतीक्षीत स्वाभिमान दिनानिमित्त भाषण केले. मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला सोडायचं असेल तर माहिती नाही. आता चेंडू भजापच्या कोर्टात आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. शिवाय पंकजा मुंडेंनी भाजपच्या कोअर कमिटीचं सदस्यत्व सोडत असल्याचं जाहीर केलं. पक्ष काढायचा की काय करयचं ते पुढे ठरवूच पण आता पक्षाने ठरवायचं आहे, असं म्हणत पंकजांनी भाजपला इशारा (Pankaja munde dhananjay munde together) दिला होता.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.