जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, पंकजांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

पंकजा मुंडे म्हणाल्या, "मदतीच्या आश्वासनाचं काय हा माझा प्रश्न आहे. पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले. राज्य सरकार हे आई वडील आहे, तर केंद्र सरकार ग्रँड प्यारेन्ट्स म्हणजे आजी-आजोबा असतात. त्यामुळे केंद्राची मदत येईलच, तो विषय वेगळा आहे. पण राज्य सरकारने आई-वडिलांची भूमिका पार पाडावी"

जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले, पंकजांचा धनंजय मुंडेंवर हल्ला
धनंजय मुंडे पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Sep 30, 2021 | 9:20 AM

बीड : मराठवाड्यात (Marathwada) झालेल्या तुफान पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी राज्य सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. याशिवाय त्यांनी बीडचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर हल्लाबोल केला आहे. नागरिकांना केलेल्या मदतीच्या आश्वासनाचं काय झालं हा माझा प्रश्न आहे. पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले, असा घणाघात पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर केला. पंकजा मुंडे यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांना तातडीने मदतीची मागणी केली.

पंकजा मुंडे म्हणाल्या, “मदतीच्या आश्वासनाचं काय हा माझा प्रश्न आहे. पालकमंत्री जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पुण्याला रवाना झाले. राज्य सरकार हे आई वडील आहे, तर केंद्र सरकार ग्रँड प्यारेन्ट्स म्हणजे आजी-आजोबा असतात. त्यामुळे केंद्राची मदत येईलच, तो विषय वेगळा आहे. पण राज्य सरकारने आई-वडिलांची भूमिका पार पाडावी”

राज्य आणि केंद्राच्या भूमिकेत जनता भरडली जातेय. मी कोणत्याही पक्षाच्या भूमिके बाबत बोलत नाही. एकमेकांकडे बोट दाखवू नये. खुर्चीची ताकद मोठी आहे. आपण खुर्चीवर बसल्यावर दुसऱ्याला दोष देऊ नये. मुख्यमंत्री जनेतला दिलासा देतील, अशी आशा आहे, असंही पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

पंकजा मुंडेंकडून नुकसानीची पाहणी 

परळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी पाहणी केली. त्यावेळी त्यांनी पिकाच्या नुकसान भरपाईसह जमिन खरवडून गेल्यानं त्यासाठी तातडीची उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. आमच्या काळात पीक विमा लाखोंनी आला. या दोन वर्षात फक्त मोदींचे दोन हजार रुपये आले. मात्र, राज्य सरकारनं काहीही दिलं नाही. आम्ही जे सेवा बघितली त्यात आम्ही जात आणि राजकारण पाहिलं नाही. आम्ही विकास पाहिला. तुम्हाला संधी दिली आहे, तर जनतेची सेवा करा. आम्ही बांधावर गेलो तेव्हा सत्ताधारी बांधावर गेले, अशा शब्दात पंकजा मुंडे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि पाकलकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली,

‘रस्त्याच्या कडेला उभे राहून पाहणी करु नका’

पूर परिस्थितीची परिस्थिती गंभीर आहे. अशा परिस्थितीत प्रशासन, शासन बांधावर पोहचले पाहिजे. प्रचंड नुकसान झाले आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील रस्त्याच्याकडेला पाहणी करतायेत. राजकीय कार्यक्रमाच्या बरोबरच रस्त्यावरील शेतावर जाऊन पाहणी केली, असा टोलाही पंकजा मुंडे यांनी लगावला.

मराठवाड्यात मोठं नुकसान 

दरम्यान राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मराठवाड्यात (Marathwada) तुफान पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती काल दिली. जवळपास 22 लाख हेक्टर जमीन पावसामुळे उद्ध्वस्त झाली आहे. अतिवृष्टीमुळे 436 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच 196 जणांचे केवळ वीज पडून मृत्यू झाले आहेत, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री मराठवाडा दौरा करणार

राज्याने आत्तापर्यंत अनेक मदतीसाठी प्रस्ताव केंद्राकडे पाठविले, तौक्ते चक्रीवादळाची मदतदेखील अजून मिळालेली नाही. मागे 10 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केले होते, त्यापैकी 7 हजार कोटींचं पॅकेजचं वाटप आत्तापर्यंत करण्यात आले.

राज्यात एकूण किती जिल्हे प्रभावित झाले त्याची माहिती घेऊन पुढील कॅबिनेटमध्ये चर्चा केली जाणार. त्यानंतर ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी चर्चा केली जाईल, असं आश्वासन विजय वडेट्टीवार यांनी दिली.

1667 कच्ची घरे पडल्याची माहिती. 19 घरं पडल्याची माहिती. काल अनेक मंत्री मंत्रिमंडल बैठकीला उपस्थित नव्हते. ते आपआपल्या जिल्ह्यात होते, आपण पाहिले असेल अनेक मंत्री बांधावर जाऊन पाहाणी केली होती. लातूर , बीड, धुळे, नंदुरबार, उस्मानाबादचे पालकमंत्री तेथे उपस्थित होते. मुख्यमंत्री सुद्धा मराठवाडा दौ-यावर जाणार, असे मला मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या  

अतिवृष्टीनं शेतकरी उद्ध्वस्त; पंकजा मुंडेंचा महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल

रस्त्याच्याकडेला उभं राहून पूरपरिस्थितीची पाहणी करू नका; पंकजा मुंडेंनी जयंत पाटील, धनंजय मुंडेंना डिवचले

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.