काँग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद, पंकजा मुंडेंची जहरी टीका
नांदेड : काँग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद असल्याची जहरी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवालेही याच काँग्रेसचे पिल्लू असल्याचे त्यांनी म्हटले. मुंडे नांदेडचे युतीचे भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारसभेत बोलत होत्या. मुखेड येथे प्रचारसभेसाठी आलेल्या पंकडा मुंडे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मुंडे म्हणाल्या, काँग्रेसवाले म्हणजे ब्रिटिशांची […]
नांदेड : काँग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद असल्याची जहरी टीका पंकजा मुंडे यांनी केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसवालेही याच काँग्रेसचे पिल्लू असल्याचे त्यांनी म्हटले. मुंडे नांदेडचे युतीचे भाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारसभेत बोलत होत्या.
मुखेड येथे प्रचारसभेसाठी आलेल्या पंकडा मुंडे यांनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मुंडे म्हणाल्या, काँग्रेसवाले म्हणजे ब्रिटिशांची औलाद आहे. त्यांनी ब्रिटिशांप्रमाणेच देशात ‘डिव्हाईड अॅंड रूल’ पॉलिसी राबवली. राष्ट्रवादी काँग्रेसही याच काँग्रेसचे पिल्लू आहे.’
भाजपला जातीयवादी म्हणणारे स्वतःच जातीयवादी असल्याचे म्हणत काँग्रेस राष्ट्रवादी जाती धर्माच्या आधारावर देशात उभी फुट पाडत असल्याचाही आरोप मुंडे यांनी केला. तसेच भाजपने कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही, असेही त्यांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ: