पंकजा मुंडे यांचं मनोज जरांगेंबाबत सर्वात मोठं विधान; दसरा मेळाव्याच्या आधीच केलेल्या विधानाची जोरदार चर्चा

ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे पंकजा मुंडे यांच्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. संघर्ष वगैरे होईल असा मी त्याला रंग देत नाही. माझ्या मेळाव्याला मुस्लिम येणार आहेत. बौद्ध बांधव येणार आहेत. मराठा बांधव येणार आहेत. माझ्या मेळाव्याला सर्व जातीचे लोक येत आहेत. त्यामुळे वेगळं काही नाही, असं पकंजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

पंकजा मुंडे यांचं मनोज जरांगेंबाबत सर्वात मोठं विधान; दसरा मेळाव्याच्या आधीच केलेल्या विधानाची जोरदार चर्चा
manoj jarangeImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 12:17 PM

बीडमध्ये आज दोन दसरा मेळावे होत आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा सावरगाव येथे होत आहे. या दसऱ्या मेळाव्याच्या निमित्ताने पंकजा मुंडे आणि त्यांचे बंधू, राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे पहिल्यांदाच एका मंचावर येणार आहेत. याशिवाय ओबीसी नेते लक्ष्मण हाकेही या मेळाव्याला हजेरी लावणार आहेत. तर, दुसरीकडे नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा होणार आहे. जरांगे पाटील यांचा हा पहिलाच दसरा मेळावा आहे. मराठा आणि ओबीसी यांच्यात आरक्षणावरून संघर्ष सुरू झालेला आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही मेळाव्याकडे लक्ष लागलेले आहे. दोन्ही नेते काय बोलणार याची उत्सुकता ताणलेली असतानाच पंकजा मुंडे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल एक विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांना मनोज जरांगे यांच्या मेळाव्याबाबत विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी मनमोकळी प्रतिक्रिया दिली. मी भाषणात काय बोलेल हे आताच सांगता येणार नाही. भाषणातच सर्व परिस्थितीवर बोलणार आहेत. नारायण गडावर आज एक मेळावा होत आहे. आमचा मेळावा तर दरवर्षी होत असतो. पण नारायण गडावर आज मेळावा होतोय हे खरं वैशिष्ट्ये आहे. मनोज जरांगे पाटील हे नारायण गडावरच्या मेळाव्याला येणार आहेत. ते काय बोलतील याची उत्सुकता आहे, असं सांगतानाच मनोज जरांगे यांचा मेळावा पारंपारिक नाही. त्यामुळे ते काय बोलणार हे ऐकायचं आहे. आमचा मेळावा पारंपारिक आहे. त्यामुळे त्यांच्या मेळाव्याशी आमचा काही संबंध नाही, असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं.

एकत्र येतोय हे वैशिष्ट्ये नाही

धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात एकत्र येणार आहेत. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. आम्ही 12 वर्षानंतर एकत्र येतो हे वैशिष्ट्ये नाही. ही परंपरा आहे. आमच्यासाठी आम्हाला भगवानबाबा महत्त्वाचे आहेत. आम्ही कधी एकत्र मेळावा केला नाही. गोपीनाथ मुंडे असताना आम्ही खाली बसून भाषण ऐकायचो. पण आम्ही मेळाव्या निमित्ताने कधी एकत्र आलो नाही. आता आम्ही गेल्या काही वर्षापासून एकत्र एकाच मंचावर येऊन भाषणं देत आहोत. त्यामुळे मंचावर एकत्र येण्याची आम्हाला सवय लागली आहे, असंही त्या म्हणाल्या.

लोकांना माझ्या भाषणाचं आकर्षण

दरवर्षी राज्यभरातून लोकं येतात. भगवान बाबांचं दर्शन करतात, सोनं लुटतात. लोकांना माझ्या भाषणाचं आकर्षण असतं. मी लोकांना संदेश देत असते. भाषण ऐकल्यावर त्यांना ऊर्जा येते. मीही त्यांच्याकडून ऊर्जा घेत असते. मी काय बोलणार हे तिथे गेल्यावरच कळेल, असंही त्यांनी सांगितलं.

तो उल्लेख भाषणात नसेल

आमचा मेळावा पारंपारिक आहे. त्यात ओबीसी- मराठा संघर्षावर बोलणार नाही. ओबीसी- मराठा संघर्ष असा रंग माझ्या मेळाव्याला नसणार आहे. दर पाच वर्षांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच माझा मेळावा येत असतो, मात्र हे काही राजकीय व्यासपीठ नाही. मात्र माझ्या भाषणातून सामाजिक, राजकीय संदेश नक्की दिला जाईल, असंही त्या म्हणाल्या.

फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी...
फडणवीसांकडून होमगार्ड्सना भेट, मानधन दुप्पट, आता प्रतिदिन 570 ऐवजी....
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे जरांगे पाटलांच्या दसरा मेळाव्यावर स्पष्टच म्हणाल्या....
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर
जरांगेंच्या नारायणगडावरील मेळाव्याचा बघा ड्रोनव्ह्यू,मराठ्यांचा जनसागर.
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.