मुंबई : “मी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक करा अशी मागणी केलेली नाही. एखाद्या रेल्वेला किंवा बिल्डींगला मुंडेंचे नाव द्या असे म्हटलं नाही. अनेकजण ठिकठिकाणी पुतळे उभे करतात मी त्यांनीही रागवते. साहेबांचे विचार जिवंत ठेवा.” असं मतं भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी व्यक्त (Pankaja Munde Exclusive interview) केले. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे जाऊन मी गोपीनाथ मुंडेंचे स्मारक करु नका,” अशी मागणी करणार आहे. असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. टीव्ही 9 मराठीच्या न्यूजरुम स्ट्राईकमध्ये पंकजा मुंडेंनी अनेक गोष्टींवर चर्चा (Pankaja Munde Exclusive interview) केली.
“मी कधीही मुंडे साहेबांचे स्मारक करा अशी मागणी केलेली नाही. एखाद्या रेल्वेला किंवा बिल्डींगला मुंडेंचे नाव द्या असे म्हटलं नाही. अनेकजण ठिकठिकाणी पुतळे उभे करतात मी त्यांनीही रागवते. साहेबांचे विचार जिवंत ठेवा. मी माझं स्मारक स्वत: बनवलं आहे ते म्हणजे गोपीनाथ गड. ते एकमेव स्मारक आहे जे मी स्वत: बनवलं आहे, कोणाकडेही न मागता. देशात अशी एकच मुलगी असेल की जिने वडिलांचे स्मारक स्वत: बनवलं. असेही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.
“गोपीनाथ मुंडे तेव्हाच जिवंत राहतील, जेव्हा त्यांचे विचार जिवंत राहतील. म्हणून मी उद्धव ठाकरेंना विनंती करणार की आता स्मारक अजिबात करु नका. जर सरकारच्या माध्यमातून स्मारक करायचे असते तर मी गोपीनाथ गड बनवला नसता.” असेही पंकजा मुंडेंनी यावेळी स्पष्ट केले.
“मी 1 डिसेंबरला टाकलेली फेसबुक पोस्टही कार्यकर्त्यांना अनुसरुन होती. या पोस्टवरुन गेले 12 दिवस वेगवेगळे विचारमंथन झाले. पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की पंकजा पक्ष सोडणार नाहीत असे अनेकदा स्पष्ट केले. मात्र तरीही चर्चा सुरु होत्या” असेही पंकजा मुंडे यावेळी (Pankaja Munde Exclusive interview) म्हणाल्या.
“जे पक्षविरोधी काम करतील त्यांची गय केली जाणार नाही हे चंद्रकांत पाटील यांचे मत योग्य आहे. जे पक्षविरोधी काम करतील त्यांची गय केलीच नाही पाहिजे. जे पक्षाच्या निष्ठेने काम करत असतील त्यांच्यात आणि पक्षविरोधी काम करणाऱ्यांमध्ये फरक असला पाहिजे.” असेही पंकजा मुंडेंनी स्पष्ट केले.
“मी पक्षनेतृत्वाच्या किंवा पक्षाच्या कोणाच्याही विरोधात बोलले नाही. मी जे बोलले ते फार स्पष्ट बोलले. त्या पोस्टमध्ये मी बंड करणार आहे असे कुठेही नाही आहे. मी पक्ष सोडणार मी बंड करणार या वावड्या कोणी उठवल्या हा तपासण्याचे विषय आहे.” असेही पंकजा मुंडेंनी यावेळी सांगितले.
“माझी लढाई सोपी नव्हती. माझ्या पाच वर्षात सरकारच्या काळात एक नाव उदयाला आलं. ते नाव सशक्त झालं. त्यावेळी मी अमित शाहांनीही सांगितले होते की माझी लढाई मला कठीण जाणार आहे.” असेही पंकजा मुंडेंनी यावेळी स्पष्ट केले.
“देवेंद्र फडणवीस तेव्हा मुख्यमंत्री व्हावेत त्यासाठी मी काम केले. आताही मी त्याचसाठी काम केले. माझा मुख्यमंत्री व्हावा यासाठी मी काम करत होते.” असेही त्या यावेळी म्हणाल्या.
“मी आज भाजपची साधी कार्यकर्ता आहे. मी आयुष्यभर केलेल्या कामावर शंका उपस्थित होत असेल. तर हे योग्य नाही,” असेही पंकजा मुंडेनी यावेळी स्पष्ट केले. “एकनाथ खडसे यांच्या परिस्थितीवर जजमेंटल होणे गरजेचे आहे.” असेही त्या यावेळी (Pankaja Munde Exclusive interview) म्हणाल्या.
“माझा पिंड आणि माझ्या बाबांचा पिंड एक आहे. मी पक्ष सोडणार या चर्चांमुळे अस्वस्थ आहे. मी पदामुळे दबाव आणते यामुळे फार अस्वस्थ आहे.” असेही पंकजा मुंडेनी स्पष्ट केले.
“भाजप शिवसेना युती आहे. त्यामुळे आमची सत्ता यायला हवी होती. तसेच कल भाजपचा मुख्यमंत्री व्हावा असाच होता. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे आता वेगळ्या अंगाने विचार करावा असे मला वाटते.” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी पक्ष सोडणार नाही असे मी कधीही विचार केलं नाही. माझ्या कमळात माझ्या बापाची समाधी आहे. माझ्या वडिलांना मी कमळात स्थान दिले आहे. मला आता एक कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. हे मला माहित होते. त्यांच्यासाठी मी आमदार गोळा करत होते. त्यामुळे ते माझा काय भ्रमनिरास करु शकतात. असा प्रश्नही पंकजा मुंडेंनी यावेळी उपस्थित केला.