मुंबई : महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा तिढा नुकताच संपला. राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने युती करत महाविकासआघाडीची सत्तास्थापन (Pankaja munde facebook post) केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपच्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. या पराभवानंतर त्यांनी तो प्रसारमाध्यामांसमोर मान्य ही (Pankaja munde facebook post) केला. यानंतर त्यांनी सत्तास्थापनेच्या तिढा सोडवण्यासाठी भाजपच्या अनेक बैठकांना हजेरी लावली. “पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता आहे. येत्या 12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर भेटू,” अशी भावनिक पोस्ट नुकतंच पंकजा मुंडेंनी फेसबुकवर (Pankaja munde facebook post) पोस्ट केली आहे.
पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट
पाच वर्षे सत्तेच्या माध्यमातून तुमची सेवा केली. मला ही सेवेची संधी केवळ आणि केवळ तुमच्या विश्वासामुळे मिळाली आणि आज पराभवानंतर माझ्याहीपेक्षा व्यथित माझ्या लोकांनी मला इतके मेसेजेस केले, इतके फोन केले, इतके निरोप दिले. “ताई आम्हाला भेटायला वेळ द्या,” ..”ताई आम्हाला तुम्हाला बघून तरी जाऊ द्या “…किती संवेदना तुम्ही माझ्यासाठी व्यक्त केली .
मी तुम्हा सर्वांची खुप खुप आभारी आहे. मला याची पुर्ण जाणीव आहे की तुमचं प्रेम हे माझ्यावर आहे आणि तेच माझं कवचकुंडल आहे. मुंडेसाहेबांनी एका क्षणात मला राजकारणात आणलं. एका क्षणात ते आपल्यातून निघूनही गेले. पहिल्यांदा मुंडेसाहेबांचा आदेश म्हणून मी राजकारणात आले आणि नंतर मुंडेसाहेबांच्या पश्चात जनतेप्रती असलेल्या जवाबदारी म्हणून राजकारणात राहिले. आज राजकारणामध्ये झालेले बदल, जबाबदारीत झालेले बदल या सगळ्या बदलत्या संदर्भांचा विचार करुन आपला सर्वांचा पुढचा प्रवास ठरवण्याची आवश्यकता (Pankaja munde facebook post) आहे.
आपण मला वेळ मागत आहात.. मी आपल्याला वेळ देणार आहे…
आठ ते दहा दिवसांनंतर…हे आठ-दहा दिवस मला थोडासा स्वत:शी संवाद साधण्यासाठी वेळ हवाय. पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? आपल्या लोकांना आपण काय देऊ शकतो? आपली शक्ती काय? लोकांची अपेक्षा काय? या सगळ्या गोष्टींचा सर्वांगाने विचार करुनच मी 12 डिसेंबर रोजी आपल्या समोर येणार आहे.
12 डिसेंबर,लोकनेते मुंडे साहेबांचा हा जन्मदिवस…त्या दिवशी बोलेन तुमच्याशी मनसोक्त…जसं तुम्हाला माझ्याशी बोलावं वाटतं, बघावं वाटतं.. तसं मलाही तुम्हाला बोलावं वाटतं. मी महाराष्ट्राच्या लोकांच्या विषयी बोलतेय …तुमच्याशी संवाद ही उत्सुकता माझ्या मनात आहे..नाहीतरी कोणाशी बोलणार आहे मी? तुमच्याशिवाय माझं कोण आहे?
12 डिसेंबरला आपल्या गोपीनाथगडावर भेटू !! येणार ना मग तुम्ही सर्व? मावळे येतील हे नक्की !!!! असे आवाहनही पंकजा मुंडे यांनी जनतेला केलं आहे. त्यामुळे 12 डिसेंबरला पंकजा मुंडे नक्की काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले (Pankaja munde facebook post) आहे.