भाजप माझ्या बापाचा पक्ष : पंकजा मुंडे

कोणी म्हणतं ना ही माझ्या बापाची जागा आहे, माझ्या बापाचं घर आहे, हा माझ्या बापाचा पक्ष आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

भाजप माझ्या बापाचा पक्ष : पंकजा मुंडे
Follow us
| Updated on: Dec 12, 2019 | 4:34 PM

बीड : कोणी म्हणतं ही माझ्या बापाची जागा आहे, तसा भाजप माझ्या बापाचा पक्ष आहे, असं सांगत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपण बंडखोरी करणार असल्याच्या चर्चा उडवून लावल्या. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त गोपीनाथगडावर आयोजित कार्यक्रमात पंकजा मुंडे (Pankaja Munde Gopinath Gad Speech) यांनी समर्थकांशी संवाद साधत जोरदार भाषण केलं.

पक्ष कुणाचा नसतो. स्वतः मोदीजीही सांगतील पक्ष माझा नाही. ते पक्षाचे सेवक आहेत. मी काय या कमळाच्या फुलावर (गोपीनाथ गडावरील कमळाची भव्य प्रतिकृती) बुलडोझर टाकू का? माझा पक्ष आहे. कोणी म्हणतं ना ही माझ्या बापाची जागा आहे, माझ्या बापाचं घर आहे, हा माझ्या बापाचा पक्ष आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

चूक असेल, तर कान धरुन सांगितलं पाहिजे. पण क्षमता असायला हवी. सत्ता असताना कार्यकर्त्यांचे लाड करायची संधी असते. पण स्वतःला विचाराचे कुबेर समजणारे लोक माझ्यावर तोंडसुख घेत होते. शेवटच्या दिवसापर्यंत भाजपचा प्रत्येक आमदार निवडून यावा यासाठी मी प्रयत्न करत होते. मी पडले, त्याचं कारण इतिहासात शोधू. पण मी बंड करणार अशी पुडी कोणी सोडली? माझी अपेक्षा कोणाकडूनही नाही, त्यामुळे मी नाराज होण्याचा प्रश्नच नाही. तोंडाला झीप लावणाऱ्या नेत्यांनी पक्ष बनत नाही. माझ्या रक्तात गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. त्यामुळे मी बंड करणार नाही, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं.

माफ करा चंद्रकांतदादा, मी आज मुक्ती मागतेय : पंकजा मुंडे

मी पक्ष सोडणार नाही, पक्षाला मला काढून टाकायचं असेल, तर पक्षाने ठरवावं, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी चेंडू भाजपच्या कोर्टात असल्याचं सांगितलं. मी राज्यभर दौरा करणार. मशाल आणि वज्रमूठ हाती धरणार. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणार, असं पंकजा मुंडे यांनी यावेळी जाहीर केलं.

आधी टीव्ही लावला तर रोज संजय राऊत दिसायचे. मात्र त्यांनी जे बोलले ते करुन दाखवलं. पण गेले 12 दिवस टीव्ही लावलं की मीच दिसायचे. मी काही न बोलताही माझंच नाव दिसायचं, पंकजाविषयी चांगलं नाही बोललंपाहिजे, यासाठी काही लोकांना नेमलं होतं, असा आरोप पंकजा मुंडेंनी केला. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी सूत्रांनाही कळला नाही. आम्ही डोळे चोळत उठल्यावर शपथविधी झाल्याचं कळलं, कारण सूत्रांचीही मर्यादा असते, असं पंकजा मुंडे (Pankaja Munde Gopinath Gad Speech) म्हणाल्या.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.