आता आणखी ताकदीने निवडणूक लढू, जयसिंगराव गायकवाडांनी भाजप सोडताच पंकजांची प्रतिक्रिया
पंकजा मुंडेंनी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मृतिस्थळावर अभिवादन केले
मुंबई : मराठवाड्यातील भाजपचे दिग्गज नेते जयसिंगराव गायकवाड (Jaisingrao Gaikwad) यांनी पक्षाला रामराम ठोकला. गायकवाड यांची समजूत घालण्याचा पक्षाकडून प्रयत्न झाला, तरीही ते भाजप सोडून गेले. पक्ष आणखी ताकदीने निवडणूक लढेल, अशी प्रतिक्रिया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतिदिनी छत्रपती शिवाजी महाराज पार्कातील स्मृतिस्थळावर अभिवादन केले. (Pankaja Munde reacts after BJP Veteran Jaisingrao Gaikwad left party)
औरंगाबाद पदवीधर निवडणूक भाजपच्या तिकीटावर जयसिंगराव गायकवाड इच्छुक होते. परंतु भाजपकडून शिरीष बोराळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे गायकवाडांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी गायकवाडांनी उमेदवारी मागे घेतलीच, परंतु भाजपलाही सोडचिठ्ठी दिली.
जयसिंगराव गायकवाड यांनी सुरुवातीपासून मराठवाडा पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीसाठी पक्षाकडे आग्रह धरला होता. हा मतदारसंघ पुन्हा भाजपकडे खेचून आणायचा असेल तर मला उमेदवारी द्यावी, असे त्यांनी म्हटले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या समर्थकांकडून सोशल मीडियावरून ‘प्रयोग थांबवा, काकांना उमेदवारी द्या’ अशी मागणी केली जात होती.
जयसिंगराव गायकवाड यांची कारकीर्द
माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री माजी सहकार राज्यमंत्री माजी मराठवाडा पदवीधर आमदार (विधानपरिषद – दोन वेळा) माजी खासदार – बीड (तीन वेळा)
मातब्बर नेत्याने पक्ष सोडला, बंडखोरही अडला; औरंगाबाद पदवीधर मतदरासंघाची लढाई भाजपसाठी अवघड https://t.co/9vHHNP8JkL #Aurangabad #BJP #NCP #Election #Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2020
(Pankaja Munde reacts after BJP Veteran Jaisingrao Gaikwad left party)
मुंडे-ठाकरे कुटुंबाचे जुने संबंध
“हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मनामध्ये आदराच्या भावना आहेत. स्मृतिस्थळ असल्यामुळे अभिवादन करण्यासाठी मी आले. बाळासाहेब पक्ष म्हणून एका विचाराचे राहू शकत नाहीत, ते सर्वांचे आहेत. बाळासाहेब आम्हा मुंडे कुटुंबासाठी आदरणीय आहेत. मुंडेसाहेब आणि बाळासाहेब यांचे घरगुती संबंध होते. इतर अनेक पक्षातही असे संबंध असतात” असं पंकजा मुंडे बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिल्यानंतर म्हणाल्या.
सरकार स्थापन होऊन एक वर्ष झालं. त्यामुळेच या चर्चेवर आता बोलणं योग्य नाही. युती 2014 मध्ये तुटली होती, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी अधिक भाष्य करणं टाळलं.
अधिक वीज बिल वसुली लॉकडाऊन च्या काळात करणे, हे अन्यायकारक आहे. अनेकांचा रोजगार गेलेला आहे. वीज बिलात सवलत देणे गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.
संबंधित बातम्या :
भाजप हा मस्तीत आलेला पक्ष, त्यांना धडा शिकवणार, जयसिंगराव गायकवाड यांचा एल्गार
केंद्रीय राज्यमंत्रिपद भूषवलेला मराठवाड्यातील भाजप नेता ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत
(Pankaja Munde reacts after BJP Veteran Jaisingrao Gaikwad left party)